Majhi Kanya Bhagyashree Yojana | लेकीच्या भविष्याची चिंता विसरा; सरकार देतं 50,000 हजार रूपये

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Majhi Kanya Bhagyashree Yojana | भारतातील (India) मुलींचा जन्मदर वाढवण्यासाठी, मुलींचा दर्जा उंचवण्यासाठी केंद्र सरकार नेहमी सकारात्मक पाऊल उचलत असतं. मुलींसाठी अनेक अशा योजना सरकार राबवत आहे. मुलींना शैक्षणिक क्षेत्रात सक्षम करणं हा सरकारी योजनेचा उद्देश आहे. अशाच एका योजनेचं नाव आहे सुकन्या समृद्धी योजना. ही योजना केंद्र सरकार राबवत आहे. या योजनांमध्ये मुलींच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च सरकार उचलतं.

महाराष्ट्र सरकारही अशीच योजना राबवत आहे. Majhi Kanya Bhagyashree Yojana असं या योजनेचं नाव आहे. या योजनेत सरकार मुलींना 50,000 रुपयांची आर्थिक मदत करते. ही योजना 1 एप्रिल 2016 पासून सरकारने सुरू केली आहे.

मुलींच्या आकडेवारीला चालना देण्यासाठी आणि मुलींना सक्षम करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने ही योजना सुरू केली आहे. या योजनेत अशा कुटुंबांचाही समावेश आहे ज्यांना दोन मुली आहेत.

Majhi Kanya Bhagyashree Yojana चा लाभ कसा मिळणार?

Majhi Kanya Bhagyashree Yojana चा लाभ फक्त महाराष्ट्रातील रहिवाशांनाच मिळणार आहे. या योजनेत आई आणि मुलीच्या नावे संयुक्त खातं उघडलं जातं. या योजनेत 1 लाख रुपयांचा अपघात विमा आणि 5000 रुपयांचा ओव्हरड्राफ्ट उपलब्ध आहे.

मुलीच्या जन्मानंतर पालकांनी नसबंदी करून घेतल्यास त्यांना 50,000 रुपये मिळतात. दोन मुली झाल्यानंतर पालकांनी नसबंदी करून घेतल्यास प्रत्येकी 25 हजार रुपये खात्यात दिले जातात. या योजनेअंतर्गत मिळणारी रक्कम मुलीच्या शिक्षणासाठी वापरली जाते.

Majhi Kanya Bhagyashree Yojana साठी अर्ज कसा करायचा?

या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला महाराष्ट्र सरकारच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल. यानंतर तुम्हाला तेथून माझी कन्या भाग्यश्री योजनेचा फॉर्म डाउनलोड करावा लागेल. तुम्हाला हा फॉर्म अत्यंत काळजीपूर्वक भरावा लागेल, काही चूक झाल्यास फॉर्म रद्द केला जाईल. फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला महिला आणि बाल विकास मंत्रालयात जाऊन सर्व कागदपत्रांसह फॉर्म सबमिट करावा लागेल.

महत्त्वाच्या बातम्या- 

MS Dhoni | धोनीचा जर्सी क्रमांक 7 कुणाला मिळणार?, BCCIचा सर्वात मोठा निर्णय

अभिनेता Shreyas Talpade च्या प्रकृतीबाबत महत्त्वाची माहिती समोर!

सावधान! ‘या’ लोकांना Heart Attack चा सर्वाधिक धोका

Lava | महागड्या फोन्सचे सर्व फीचर्स, सध्या अत्यंत स्वस्तात मिळतोय ‘हा’ खतरनाक फोन

Shreyas Talpade | मोठी बातमी! अभिनेता श्रेयस तळपदेला ह्रदयविकाराचा झटका