Shreyas Talpadeच्या प्रकृतीबाबत पत्नीने सोशल मीडियावर केला मोठा खुलासा

Shreyas Talpade | मराठी अभिनेता श्रेयस तळपदे याला रात्री उशीरा हृदयविकाराचा झटका आला. श्रेयसबद्दल माहिती मिळताच सिनेसृष्टीत एकच खळबळ उडाली. व्याच्या 47 व्या वर्षी श्रेयसला हृदयविकाराचा झटका आल्याने त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला. दरम्यान, सोशल मीडियावर त्याच्या पत्नीने एक पोस्ट शेअर केली आहे.

काय म्हणाली दिप्ती तळपदे?

श्रेयस तळपदे याच्या प्रकृतीबद्दल सिनेसृष्टीतील कलावंत तसेच त्याचे चाहते काळजी करत आहेत. श्रेयसच्या चाहत्यांनी त्याच्या प्रकृतीची चिंता व्यक्त करत तो लवकर बरा होवो, अशी प्रार्थना केली आहे.

दिप्ती म्हणाली की, “माझ्या पतीने नुकत्याच अनुभवलेल्या प्रकृतीच्या समस्येनंतर अनेक कलाकारांनी आणि त्याच्या चाहत्यांनी काळजी व्यक्त केली. तो लवकरात लवकर बरा व्हावा यासाठी अनेकांनी प्रार्थना केल्या. त्या सर्वांची मी मनापासून कृतज्ञता व्यक्त करते. आता त्याची प्रकृती स्थिर आहे आणि काही दिवसांतच त्याला डिस्चार्ज देण्यात येईल.”

“रुग्णालयातील वैद्यकीय टीमने वेळेवर आणि तातडीने उपचार केले. त्याबद्दल मी त्यांचेही आभार मानते. श्रेयसच्या प्रकृतीत सुधारणा होत असताना आम्ही काही गोष्टी खासगी ठेवू इच्छितो, त्याचा तुम्ही आदर करावा अशी मी विनंती करते. तुमचा भक्कम पाठिंबा हा आम्हा दोघांसाठी प्रचंड ताकदीचा स्रोत आहे,” असं म्हणत दिप्तीने एक पोस्ट शेअर केली आहे.

श्रेयस तळपदेला अचानक काय झालं?

रात्री उशीरा श्रेयस ‘वेलकम टू जंगल’ या चित्रपटाचं चित्रिकरण संपवून घरी आल्यावर त्याला अस्वस्थ वाटू लागलं, आणि त्याला श्वास घ्यायला त्रास होऊ लागला. श्रेयसला अस्वस्थ वाटू लागल्याने त्याने त्याच्या पत्नीला (दिप्तीला) सांगितलं.

दरम्यान, दिप्तीने तातडीने श्रेयसला मुंबईच्या अंधेरी येथील बेलेव्यू रुग्णालयात दाखल केलं. रुग्णालयात जात असताना वाटेत श्रेयसला चक्कर देखील आली होती, अशी माहिती समोर आली आहे.

Shreyas Talpade

डाॅक्टर काय म्हणाले?

श्रेयसला उपचारासाठी दाखल केल्यानंतर डाॅक्टरांनी त्याला हृदयविकाराचा झटका आल्याचं सांगितलं. त्यानंतर रात्री उशीरा श्रेयसवर अँजियोप्लास्टी करण्यात आल्याची माहिती डाॅक्टरांनी दिली आहे.

News Title : shreyas talpade wife update about his health

थोडक्यात बातम्या-

MS Dhoni | धोनीचा जर्सी क्रमांक 7 कुणाला मिळणार?, BCCIचा सर्वात मोठा निर्णय

अभिनेता Shreyas Talpade च्या प्रकृतीबाबत महत्त्वाची माहिती समोर!

सावधान! ‘या’ लोकांना Heart Attack चा सर्वाधिक धोका

Lava | महागड्या फोन्सचे सर्व फीचर्स, सध्या अत्यंत स्वस्तात मिळतोय ‘हा’ खतरनाक फोन

Shreyas Talpade | मोठी बातमी! अभिनेता श्रेयस तळपदेला ह्रदयविकाराचा झटका