Angioplasty | श्रेयस तळपदेवर करण्यात आलेली शस्त्रक्रिया नेमकी आहे तरी काय?

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Angioplasty | अभिनेता श्रेयस तळपदेला (Shreyas Talpade) हृदयविकाराचा झटका (heart attack) आला आहे, त्यामुळे सिनेसृष्टीत एकच खळबळ उडाली आहे. त्याच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी यासाठी प्रार्थना केली जात आहे. हृदयविकाराचा झटका आल्यानंतर श्रेयसवर अँजिओप्लास्टीची शस्त्रक्रिया केल्याची माहिती आहे. नेमकी काय आहे ही शस्त्रक्रिया? ही शस्त्रक्रिया नेमकी कशी केली जाते?, अँजिओप्लास्टी करण्याचे काय फायदे आहेत? आणि या शस्त्रक्रियेचे काही तोटे आहेत का आपण या लेखात पाहणार आहोत…

अँजिओप्लास्टी म्हणजे काय?-

अँजिओप्लास्टी ही एक हृदयासंबंधी महत्त्वाची शस्त्रक्रिया आहे. जी हृदयाच्या रक्तवाहिन्यांमधील अडथळा दूर करण्यासाठी केली जाते. हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये जेव्हा अडथळा निर्माण होतो तेव्हा हृदयाला होणारा रक्तपुरवठा कमी होतो किंवा थांबतो, यामुळे छातीत दुखणे तसेच काही जणांना थेट हृदयविकाराचा झटका सुद्धा येऊ शकतो.

अँजिओप्लास्टी कशी केली जाते?

सध्याच्या काळात तंत्रज्ञान फार सुधारलेलं आहे, त्यामुळे अँजिओप्लास्टी एक सर्वसाधारण शस्त्रक्रिया मानली जाते. या शस्त्रक्रियेत कॅथेटर नावाच्या पातळ, लवचिक ट्यूबला कल्ले किंवा हाताच्या धमन्यांमध्ये घालून हृदयातील बंद धमनीपर्यंत नेले जाते. एकदा कॅथेटर धमन्यांमध्ये पोहोचल्यावर, खालील दोन पद्धतींपैकी एक पद्धत वापरली जाते-

  • बलून अँजिओप्लास्टी- कॅथेटरच्या टोकावरील लहान फुगा फुगवला जातो, ज्यामुळे प्लेक दाबला जातो, यामुळे धमनी रुंदावली जाते आणि रक्तवाहिनीच्या मार्गातील अडथळा दूर होतो.
  • स्टेन्ट प्लेसमेंट- धमन्यांच्या अरुंद भागात एक लहान, विस्तार करणारी जाळीदार ट्यूब (स्टेन्ट) ठेवली जाते, ज्यामुळे धमनी नेहमी उघडी राहते आणि हृदयाचा रक्त प्रवाह कमी होत नाही.

अँजिओप्लास्टी करण्याचे फायदे-

अँजिओप्लास्टी ही एक सर्वसाधारण शस्त्रक्रिया मानली जाऊ लागली आहे, कारण या शस्त्रक्रियेत शरिराला चीर पाडावी लागत नाही, ज्यामुळे कमी वेदना आणि बरे होण्याचा कालावधी देखील कमी होतो. अँजिओप्लास्टी काही तासांत पूर्ण होऊ शकते, तर बायपास शस्त्रक्रियेसाठी अनेक दिवस लागतात. बायपासच्या तुलनेत अँजिओप्लास्टीमध्ये संसर्ग आणि इतर गुंतागुंतांचा धोका कमी असतो.

अँजिओप्लास्टी केल्यानंतर काय त्रास होतो?

अँजिओप्लास्टी ही एक सुरक्षित शस्त्रक्रिया आहे, मात्र काही प्रकरणांमध्ये गुंतागुंत निर्माण होऊ शकते. यामध्ये कॅथेटरच्या प्रवेश करतो त्या जागी रक्तस्त्राव होऊ शकतो. त्या जागेवर जंतूसंसर्ग होऊ शकतो. कधीकधी स्टेन्ट त्याच्या जागेवरुन हलू शकतो. अँजिओप्लास्टी केलेल्या धमनीमध्ये पुन्हा अडथळा निर्माण होऊ शकतो, अशा प्रकारच्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो, मात्र फार कमी प्रकरणांमध्ये अशा गोष्टी झाल्याचं समोर आलं आहे.

अँजिओप्लास्टी केल्यानंतरचे काय काळजी घेतली पाहिजे?-

अँजिओप्लास्टी केल्यानंतर रुग्णांना काही काळासाठी काळजी घेणे आवश्यक असते. यामध्ये रुग्णांना विश्रांती घेणे आणि शक्य तितकी कमी हालचाल करणे आवश्यक असते. डॉक्टर औषधे लिहून देऊ शकतात जे रक्तस्त्राव आणि संसर्ग रोखण्यास मदत करतात, ती नियमित घ्यायला हवी. रुग्णांना नियमित तपासणीसाठी डॉक्टरांना भेटणे आवश्यक असते.

News Title: what is angioplasty shreyas talpade

महत्त्वाच्या बातम्या-

Shreyas Talpadeच्या प्रकृतीबाबत पत्नीने सोशल मीडियावर केला मोठा खुलासा

Majhi Kanya Bhagyashree Yojana | लेकीच्या भविष्याची चिंता विसरा; सरकार देतं 50,000 हजार रूपये

MS Dhoni | धोनीचा जर्सी क्रमांक 7 कुणाला मिळणार?, BCCIचा सर्वात मोठा निर्णय

अभिनेता Shreyas Talpade च्या प्रकृतीबाबत महत्त्वाची माहिती समोर!

सावधान! ‘या’ लोकांना Heart Attack चा सर्वाधिक धोका