Love | प्रेमाचे आहेत ‘इतके’ प्रकार, तुम्हाला माहितीयेत का?

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

मुंबई | प्रेम ही एक भावना आहे ज्याचा प्रत्येकासाठी वेगळा अर्थ आहे. आपण सर्वजण आपल्या आयुष्यात एकदा तरी प्रेमाचा अनुभव घेतो. पण सगळ्यांसाठी प्रेमाची व्याख्या वेगळी असते. पण तुम्ही कधी प्रेमाच्या विविध प्रकारांबद्दल विचार केला आहे का? प्रेमाचे अनेक प्रकार आहेत त्यापैकी एक म्हणजे निस्वार्थ प्रेम.

निस्वार्थ प्रेम (selfless love)

निस्वार्थी प्रेम म्हणजे कोणतीही अपेक्षा न ठेवता प्रेम देणं. समोरच्याकडून आपल्याला काहीच नको असतं पण तरीही त्याच्या बद्दल वाटणाऱ्या भावन खूप निथळ आणि प्रामाणिक असतात. समोरच्याला आपल्याबद्दल काही वाटलं नाहीतरी आपण त्याला आपलं सर्वस्व द्यायला तयार असतो हेच निस्वार्थ प्रेम असतं. कारण आपल्याला फक्त त्या व्यक्तीला आनंदी पाहायचं असतं. यात कोणताच स्वार्थ नसतो. ना ही कोणती अपेक्षा. कधी कधी त्या नात्याला नावही देता येत नाही. पण तरीही त्याचा विचार न करता आपण त्या व्यक्तीवर करतो ते निस्वार्थ प्रेम. निस्वार्थ प्रेम करणारे लोक दयाळू आणि समजूतदार असतात.

आदर्श प्रेम (Ideal love)

आदर्श प्रेम एक खास प्रकारचं प्रेम आहे. त्यात सहसा तुमच्या मित्रांचा समावेश असतो. त्यांना तुमच्या सर्व दोषांची जाणीव आहे, पण तरीही त्यांना तुमच्यासोबत राहायला आवडतं. तुम्हाला त्यांच्या चांगल्या वाईट सगळ्या गोष्टी माहिती असतात. तरीही ते तुमच्या सोबत राहणं पसंत करतात. त्यांना तुमच्या कोणताही बदल करायचा नसतो. ते तुम्हाला तुम्ही जसे आहात तसे स्विकारतात.

वेडं प्रेम (Crazy love)

यामध्ये व्यक्ती रिलेशनशिपमध्ये राहून आपल्या आयुष्यातील पोकळी भरून काढण्याचा प्रयत्न करत असते. हा एक प्रकारचा प्रेम आहे जो सहसा सह-आश्रित नातेसंबंधांमध्ये दिसून येतो, कारण त्यांना वाटते की त्यांना त्यांच्या जोडीदाराची गरज आहे, ज्याशिवाय ते अपूर्ण आहेत. त्या जोडीदाराशिवाय राहूच शकत नाहीत.

स्वतःवर प्रेम करणे (Self Love)

दुसऱ्यांवर प्रेम करण्याआधी आपण स्वत:वर प्रेम करायला हवं. तुम्ही स्वतःवर प्रेम केले पाहिजे. आयुष्यात आनंदी राहायचं असेल तर तुमचं स्वत:वर प्रेम असायला हवं. आपण जसे आहोत तसं स्वत:ला स्विकारायला हवं. कारण आपण आयुष्यभर इतरांशी आपली तुलना करत असतो. यामुळे स्लेफ डाऊट्स वाढतात. आपण डिप्रेशनमध्येही जाऊ शकतो.

महत्त्वाच्या बातम्या- 

Shreyas Talpadeच्या प्रकृतीबाबत पत्नीने सोशल मीडियावर केला मोठा खुलासा

Majhi Kanya Bhagyashree Yojana | लेकीच्या भविष्याची चिंता विसरा; सरकार देतं 50,000 हजार रूपये

MS Dhoni | धोनीचा जर्सी क्रमांक 7 कुणाला मिळणार?, BCCIचा सर्वात मोठा निर्णय

अभिनेता Shreyas Talpade च्या प्रकृतीबाबत महत्त्वाची माहिती समोर!

सावधान! ‘या’ लोकांना Heart Attack चा सर्वाधिक धोका