तारक मेहता मालिकेत सर्वात मोठा बदल, ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीची एन्ट्री! – Taarak Mehta Ka Ooltah Chashmah

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah | तारक मेहता का उल्टा चश्मा ही मालिका गेल्या काही दिवसांपासून चांगलाच चर्चेचा विषय बनली आहे. कधी वादामुळे तर कधी या मालिकेतील कलाकारांच्या सोडून जाण्याचे या मालिकेची नेहमीच चर्चा होत आहे, मात्र गेल्या 15 वर्षांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करणारी ही मालिका लोकांमध्ये चांगलीच लोकप्रिय आहे आणि प्रेक्षकांना या मालिकेचे सर्व अपडेट सुद्धा हवे असतात.

आता सुद्धा या मालिकेबद्दल एक महत्त्वाची अपडेट आली आहे. Taarak Mehta Ka Ooltah Chashmah या मालिकेत आता एका नव्या अभिनेत्रीची एन्ट्री होणार आहे. मालिकेत नव्या अभिनेत्रीची एन्ट्री म्हटल्यावर सगळ्यांना प्रश्न पडला असेल की ही अभिनेत्री कोण?, आणि कोणाच्या जागी या अभिनेत्रीची या मालिकेत निवड करण्यात आली आहे?

कोण आहे ही अभिनेत्री?

मोनाज मेवावाला (monaz mevawala) असं या अभिनेत्रीचं नाव आहे. मोनाज लवकरच Taarak Mehta Ka Ooltah Chashmah या मालिकेत आपल्याला दिसेल. मालिकेत मिसेस सोढी नावाचं एक पात्र आहे. याआधी अभिनेत्री जेनिफर मिस्त्री ही भूमिका साकारताना दिसली होती, मात्र याच वर्षी एप्रिल 2023 मध्ये जेनिफरने या मालिकेला रामराम ठोकला, त्यानंतर हे पात्र अद्याप कुणाला दिलं गेलेलं नव्हतं.

आता मिसेस सोढी म्हणून मोनाज मेवावाला हिची निवड करण्यात आली आहे. मोनाज एक प्रसिद्ध टीवी कलाकार आहे. तीने याआधी ‘मीत मिला दे रब्बा’ तसेच ‘रिश्तों की डोर’ सारख्या मालिकांमध्ये काम केलं आहे. याशिवाय ती एक प्रसिद्ध साल्सा डान्सर सुद्धा आहे.

2004 मध्ये सुरु केलं काम-

मोनाज मेवावालाने आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘किट्टी पार्टी’ मालिकेत काम करण्यापासून केली होती. त्यानंतर ती स्टँडअप कॉमेडी शो ‘द ग्रेट इंडियन कॉमेडी शो’चा सुद्धा एक भाग होती. CID, सावधान इंडिया, FIR यासारख्या मालिकांमध्ये देखील तीनं काम केलं आहे. गुजराती सिनेमांमध्ये सुद्धा ती झळकली आहे.

मोनाज मेवावाला टीवी सिरियल्सशिवाय सोशल मीडियावर सुद्धा चांगलीच अॅक्टिव असते. सोशल मीडियावर सुद्धा तिची क्रेझ पहायला मिळते. आता Taarak Mehta Ka Ooltah Chashmah मालिकेत तिची निवड झाल्याने तिच्या लोकप्रियतेमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

News Title: taarak mehta ka ooltah chashmah new actress monaz mevawala

महत्त्वाच्या बातम्या-

INDvSA | मोहम्मद शमी भारतीय संघातून बाहेर?, समोर आलं अत्यंत धक्कादायक कारण

Royal Enfield | मायलेजला ‘बाप’ गाडी; एका लिटरमध्ये ‘इतके’ किलोमीटर धावते

CNG | सर्वसामान्य जनतेला मोठा फटका; सीएनजीच्या दरात ‘इतक्या’ रूपयांची वाढ

Uddhav Thackeray | मोठी बातमी! उद्धव ठाकरेंना धारावी पोलिसांचा धक्का

RCB ला मोठा झटका; लिलावाआधी वाईट बातमी समोर