Uddhav Thackeray | मोठी बातमी! उद्धव ठाकरेंना धारावी पोलिसांचा धक्का

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

मुंबई | शिवसेना गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) पोलिसांनी धक्का दिलाय. धारावी पोलिसांनी मोर्चाला परवानगी देण्याबाबत स्पष्टपणे असमर्थता दर्शवली आहे. धारावी पोलिसांनी मोर्चाला परवानगी नाकारली आहे.

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटाने धारावी पोलिसांकडे परवानगी मागितली होती. ठाकरे गटाने धारावी पोलिसांना परवानगीसाठी पत्र पाठवलं होतं. पण धारावी पोलिसांनी ठाकरे गटाची मागणी मान्य केलेली नाही.

नेमकं प्रकरण काय?

धारावीच्या झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पाची जबाबदारी अदानी उद्योग समूहास मिळाली आहे. या योजनेअंतर्गतच्या कामकाजात टीडीआर घोटाळा झाल्याचा आरोप ठाकरे गटाकडून करण्यात आलाय. यामुळे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी अदानी उद्योग समूहाच्या विरोधात मोर्चा काढण्याचा इशारा दिलाय.

स्थानिकांची फसवणूक केली जात असल्याचा आरोप ठाकरे गटाने केलाय. त्यामुळे ठाकरे गटाकडून धारावीत मोर्चा काढण्यात येणार आहे. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे स्वत: या मोर्चाचं नेतृत्व करणार आहेत. मात्र आता पोलिसांनी परवानगी नाकारत ठाकरेंना धक्का दिलाय.

मोर्चाच्या परवानगीसाठी मुंबई पोलीस आयुक्तांना पत्र पाठवा, असं ठाकरे पोलिसांनी म्हटलं आहे. धारावी पोलिसांच्या या सूचनेनंतर ठाकरे गटाने (Uddhav Thackeray) मुंबई पोलीस आयुक्तांकडे मोर्चासाठी अर्ज केला आहे.

Uddhav Thackeray यांचा इशारा

धारावीधारकांना 400 ते 500 चौरस फुटांची घरे मिळायला हवीत. योग्य पद्धतीने सर्वेक्षण करावं, धारावीकरांना धाक दाखवून, दडपशाही किंवा दमदाटीच्या जोरावर सर्वेक्षण केलं तर शिवसेना हा कट हाणून पाडेल, असं उद्धव ठाकरे म्हणालेत.

महत्त्वाच्या बातम्या- 

RCB ला मोठा झटका; लिलावाआधी वाईट बातमी समोर

Malaika Arora सोबत लग्न कधी करणार?, अर्जुन कपूरने अखेर खरं ते सांगून टाकलं

MLA disqualification | “निकाल दिला तर शिंदे अडचणीत येतील, त्यामुळे…”

Animal सिनेमात रणबीर कपूरसोबत माझा किसिंग सीन!; बॉबी देओलचा धक्कादायक खुलासा

‘Rishi Kapoor महिलांसोबत वन नाईट स्टँड…’; नीतू कपूर यांचा धक्कादायक खुलासा