RCB ला मोठा झटका; लिलावाआधी वाईट बातमी समोर

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

मुंबई | आयपीएल (IPL 2024) साठी एकीकडे सर्व संघ तयारीला लागले आहेत. 19 डिसेंबर रोजी दुबईत लिलाव होणार आहे. आयपीएल लिलाव तोंडावर आला असताना RCB संघासाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. सर्वात महागडा ठरलेला खेळाडू गंभीर आजाराने त्रस्त असल्याचं समोर आलं आहे.

RCB संघासाठी एक वाईट बातमी

कॅमेरून ग्रीन एका गंभीर आजाराने त्रस्त आहेत. याचा खुलासा खुद्द कॅमेरून ग्रीन याने केला आहे. कॅमेरून ग्रीन आता आरसीबीकडून (RCB) IPL मध्ये खेळताना दिसणार आहे.

कॅमेरून ग्रीन किडनीच्या गंभीर आजाराने त्रस्त

ऑस्ट्रेलियाचा स्टार अष्टपैलू कॅमेरून ग्रीनने खुलासा केला की, तो जन्मापासूनच किडनीच्या गंभीर आजाराने त्रस्त आहे. कॅमेरॉन ग्रीन यांनी सांगितलं की, त्यांचा आजार त्यांच्या आईच्या 19 व्या आठवड्याच्या गर्भधारणेच्या स्कॅन दरम्यान आढळला.

 

 

कॅमेरून ग्रीनचे वडील गॅरी यांनी त्याच्या क्रिकेट कारकिर्दीत महत्त्वाची भूमिका बजावली. त्याच्या वडिलांनी नोंदवलं की कॅमेरॉन ग्रीन 12 वर्षांच्या पुढे जगेल की नाही याबद्दल चिंता होती. ग्रीन यांनी सांगितलं की, जेव्हा त्याचा जन्म झाला तेव्हा पालकांना सांगण्यात आले की मुलाला किडनीचा गंभीर आजार आहे.

‘ग्रीन चॅनल 7’ शी बोलताना त्यांनी हे सर्व खुलासे केले. ग्रीनने सांगितलं की त्यांना या आजाराची कोणतीही लक्षणे नाहीत, परंतु अल्ट्रासाऊंडद्वारे ते शोधण्यात आलं. किडनीचा आजार हा मुळात किडनीच्या आरोग्य कार्याचा आजार आहे. ग्रीन म्हणाले की, त्यांची किडनी इतर किडनींप्रमाणे रक्त फिल्टर करत नाही. ते सध्या सुमारे 60% आहेत, ज्याला दुसरा टप्पा म्हणतात.

मला गेल्या वर्षी केर्न्समध्ये न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात खेळताना त्रास झाला होता. एक इनिंग फिल्डिंग, पाच ओव्हर बॉलिंग आणि नाबाद 89 धावांवर असताना मला त्रास जाणवल्याचं ग्रानने सांगितलं.

महत्त्वाच्या बातम्या- 

Malaika Arora सोबत लग्न कधी करणार?, अर्जुन कपूरने अखेर खरं ते सांगून टाकलं

MLA disqualification | “निकाल दिला तर शिंदे अडचणीत येतील, त्यामुळे…”

Animal सिनेमात रणबीर कपूरसोबत माझा किसिंग सीन!; बॉबी देओलचा धक्कादायक खुलासा

‘Rishi Kapoor महिलांसोबत वन नाईट स्टँड…’; नीतू कपूर यांचा धक्कादायक खुलासा

Share Market | ‘या’ शेअरने दिला तिप्पट परतावा; गुंतवणूकदार मालामाल