MLA disqualification | “निकाल दिला तर शिंदे अडचणीत येतील, त्यामुळे…”

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

मुंबई | शिवसेनेच्या आमदारांबाबत (MLA disqualification) 31 डिसेंबरपर्यंत सुनावणी घेऊन निर्णय घ्यावा, असे निर्देश न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना दिलेत. त्यामुळे नागपुरमध्ये हिवाळी अधिवेशन सुरु असतानाही नार्वेकर दररोज सुनावणी घेत आहेत.

सोमवारपासून 3 दिवस आमदार अपात्रतेवर (MLA disqualification) अंतिम सुनावणी होणार आहे. म्हणजेच 18 ते 20 डिसेंबरपर्यंत सुनावणी पूर्ण होईल आणि त्यानंतर नार्वेकर अंतिम निकाल लिहिण्यास सुरुवात करतील. मात्र या निकालाआधी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

MLA disqualification | रोहित पवार काय म्हणाले?

निकाल देण्याआधीच म्हणजे 31 डिसेंबरच्या आत अध्यक्ष राहुल नार्वेकरच राजीनामा देतील आणि हे प्रकरण पुन्हा लांबवलं जाईल, असं आमदार रोहित पवार यांनी म्हटलंय.

MLA disqualification | “…तर शिंदे अडचणीत येतील”

माझ्या ऐकण्यात जे आलं आहे तेच मी सांगितलं. सत्या हेच आहे की जर निकाल दिला तर एकनाथ शिंदे अडचणीत यईल आणि सरकार देखील अडचणीत येईल. त्यामुळे सगळ्यांचीच अडचण होईल, असं रोहित पवारांनी म्हटलंय.

निवडणूक आयोग ही स्वायत्त संस्था आहे. पण, एक निश्चित आहे की दहा महिने पुण्याची जागा रिक्त राहिली. तिथे निवडणूक घेतली गेली नाही. कारण सरकार घाबरलेलं आहे. सरकारला भीती आहे जे काही इतर राज्यांमध्ये घडलं आहे. जो विजय त्यांना इतर राज्यात मिळाला तेच समीकरण इथे होईल याची कोणतीही शाश्वती नाही. त्यामुळे निवडणुका घेतल्या जात नाहीत, असा आरोपही त्यांनी केला.

दरम्यान, अजित पवार यांनी शरद पवारांबद्दल जे काही वक्तव्य केलं ते अत्यंत चुकीचं आहे. ज्याच्यासोबत काम केलं, लहानाचे मोठे झाले त्यांच्यावर सत्तेच्या लालसेपोटी अशी टीका करणे हे नियमांना, संकेतांना धरून नाही, अशी टीकाही रोहित पवारांनी केली.

महत्त्वाच्या बातम्या- 

Animal सिनेमात रणबीर कपूरसोबत माझा किसिंग सीन!; बॉबी देओलचा धक्कादायक खुलासा

‘Rishi Kapoor महिलांसोबत वन नाईट स्टँड…’; नीतू कपूर यांचा धक्कादायक खुलासा

Share Market | ‘या’ शेअरने दिला तिप्पट परतावा; गुंतवणूकदार मालामाल

Gautami Patil | ‘…आता भीती वाटते’; गौतमीने केला मोठा खुलासा

LIC वाल्यांना छप्परफाड कमाई, रिटर्न्सचे आकडे ऐकाल तर थक्क व्हाल