MLA disqualification | मोठी बातमी! आमदार अपात्र प्रकरणात नवा ट्विस्ट

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Maharashtra politics | शिवसेना आमदार अपात्र प्रकरणाची (MLA disqualification) गेले अनेक दिवस विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या समोर सुनावणी सुरु आहे. या सुनावणीत दोन्ही बाजूंचा जोरदार युक्तीवाद सुरु आहे. आज देखील अतिशय महत्त्वाची सुनावणी पार पडली.

आमदार अपात्रतेच्या प्रकरणात नवा ट्विस्ट

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा खरा ईमेल आयडी कोणता? या मुद्द्यावरुन आज पुन्हा युक्तिवाद झाला. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर आमदार अपात्र प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान (MLA disqualification) शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी यांनी महाराष्ट्र विधानसभेची 2022 ची नोंदवही सादर केली.

अध्यक्षांनी ठाकरे गटाची मागणी केली मान्य

ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत यांनी 2023 च्या सुद्धा नोंदवहीमधील ईमेल आयडी रेकॉर्डवर घेण्याची विनंती केली. पण त्यावर शिंदे गटाच्या वकिलांनी आक्षेप घेतला. यावेळी दोन्ही गटाच्या वकिलांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. अखेर विधानसभा अध्यक्षांनी ठाकरे गटाची मागणी मान्य केली.

22 जून 2022 साली एकनाथ शिंदे यांना पाठवलेली नोटीस चुकीच्या मेल आयडीवर पाठवल्याचा युक्तिवाद याआधी शिंदे गटाच्या वकिलांनी केला होता. त्याला अनुसरून जेठमलानी यांनी विधानसभेची नोंदवहीवर वेगळा मेल आयडी असल्याचा मुद्दा मांडला. परिणामी ठाकरे गटाने यावर्षी 2023 मध्ये प्रकाशित झालेला मेल आयडी सादर करण्याचा प्रयत्न केला. त्यास जेठमलानी यांनी आक्षेप घेतला.

तुम्ही एकनाथ शिंदे यांचा ईमेल चुकीचा आहे म्हणू शकत नाही. तुम्ही सगळे बनावट आहे असं बोलणं चुकीचं आहे. साक्ष नोंदविण्यासाठी ज्यांनी मेल पाठवला आहे ते विजय जोशी यांची उलट तपासणीमध्ये हे प्रश्न विचारले. त्यांचा ईमेल चेक करा. ते दाखवतील मेल कधी कसा पाठवला ते दाखवतील, असा युक्तीवाद कामत यांनी केलाय.

दरम्यान, अवकाळी पावसाचा मुद्दा, शेतकऱ्यांचे प्रश्न, आरक्षणासारखा महत्त्वाचा प्रश्न आहे. अधिवेशन माझी प्राथमिकता असूनही मी सुनावणीला वेळ देत आहे. तुम्ही सुद्धा सुनावणीत युक्तिवादाला कात्री लावून सुनावणी घेत आहात. त्यामुळे युक्तिवादाला आणखी 4 दिवस देणे अशक्य आहे. 22 तारखेपर्यंत वेळ दिलेला आहे. त्यामुळे 26 तारखेपर्यंत सुनावणी घेणे अशक्य आहे. आपण सगळ्यांनी मिळून ही प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करायला हवी, असं नार्वेकरांनी म्हटलंय.

A new twist in MLA disqualification case

महत्त्वाच्या बातम्या- 

सरकार शेतकऱ्यांना देतं 12 हजार रूपये, ‘ही’ योजना तुम्हाला माहितीये का?

Lumpy Skin | शेतकऱ्यांनो सावधान, ‘या’ आजाराची धास्ती पुन्हा वाढली!

अजित पवार यांची सर्वात मोठी घोषणा, “लोकसभेच्या ‘या’ 4 जागा लढवणार!”- Ajit Pawar

SBI मध्ये खातं असणाऱ्यांसाठी मोठी बातमी!

Weather update | 24 तासात ‘या’ भागात अतिवृष्टीचा अंदाज, तर काही भागात बर्फवृष्टीचाही इशारा!