सरकार शेतकऱ्यांना देतं 12 हजार रूपये, ‘ही’ योजना तुम्हाला माहितीये का?

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

मुंबई | सरकार शेतकऱ्यांसाठी अनेक योजना आणत असतं. पण अनेक शेतकऱ्यांना या योजनांबद्दल माहितीच नसतं. अशाच एका योजनेबद्दल जाणून घेऊ. ज्यात शेतकऱ्यांना सरकार वर्षाला 12 हजार रूपये देतं. महाराष्ट्र सरकारने राज्यातील शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी (Farmers) महासन्मान निधी योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत, महाराष्ट्रातील प्रत्येक (Namo Shetkari Yojana) शेतकऱ्याला दरवर्षी 12 हजार रुपये आर्थिक सहाय्य दिलं जातं.

काय आहे योजना?

केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या धर्तीवर राज्य सरकारने देखील नमो शेतकरी महासन्मान निधी योजना सुरु केली आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेअंतर्गत केंद्र सरकार दरवर्षी शेतकऱ्यांना 6000 रुपयांची मदत देते. त्याच धर्तीवर राज्य सरकार देखील नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वर्षाला 6000 रुपयांची आर्थिक मदत देणार आहे. त्यामुळे आता दरवर्षी शेतकऱ्यांच्या खात्यावर 12000 रुपये येणार आहेत. म्हणजे प्रत्येकी चार महिन्याला शेतकऱ्यांना आता 2000 रुपयांऐवजी 4000 रुपये मिळणार आहेत.

या योजनेसाठी शेतकरी (Farmers) हा महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असला पाहिजे. तसेच शेतकऱ्याकडे स्वतःची शेतजमीन असावी. शेतकऱ्याकडे स्वतःचं बँक खातं असावं आणि ते आधार कार्डशी लिंक केलेलं असावं. शेतकरी हा पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा लाभार्थी असावा.

सरकार शेतकऱ्यांना देतं 12 हजार रूपये

या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी शेतकऱ्यांना ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येईल. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी शेतकऱ्यांना (Farmers) शासनाच्या अधिकृत वेबसाइटवर जावं लागेल. या योजनेमुळे राज्यातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळेल आणि त्यांचं उत्पन्न वाढण्यास मदत होईल.

नमो शेतकरी सन्मान योजनेचा लाभ मिळालेले सर्वाधिक शेतकरी हे अहमदनगर जिल्ह्यातील आहेत. नगर जिल्ह्यातील 5 लाख 17 हजार 611 शेतकऱ्यांना 103 कोटी रुपये वितरित करण्यात आलेत. सोलापूर जिल्ह्यातील 4 लाख 54 हजार 40 शेतकऱ्यांना 90 कोटी 81 लाख, कोल्हापूर जिल्ह्यातील 4 लाख 6 हजार 240 शेतकऱ्यांना 81 कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत.

Government gives 12,000 thousand rupees to farmers

महत्त्वाच्या बातम्या- 

Lumpy Skin | शेतकऱ्यांनो सावधान, ‘या’ आजाराची धास्ती पुन्हा वाढली!

अजित पवार यांची सर्वात मोठी घोषणा, “लोकसभेच्या ‘या’ 4 जागा लढवणार!”- Ajit Pawar

SBI मध्ये खातं असणाऱ्यांसाठी मोठी बातमी!

Weather update | 24 तासात ‘या’ भागात अतिवृष्टीचा अंदाज, तर काही भागात बर्फवृष्टीचाही इशारा!

Winter session | ‘जय हिंद’,’वंदे मातरम्’, थँक्स सारख्या घोषणांना मज्जाव!, खासदारांसाठी नियमावली जारी