Lumpy Skin | राज्यात एकीकडे अवकाळी पावसाने धुमाकुळ घातला आहे. त्यामुळे बळीराजाच्या शेतातील पिकांचं मोठं नुकसान झालं. सध्या शेतकऱ्यांसमोर पिकांबाबत प्रश्न पडला आहे. हे सुरु असताना आता शेतकऱ्यांसाठी चिंताजनक बातमीसमोर आली आहे. एक नवीनच संकट शेतकऱ्यांसमोर उभं ठाकलं आहे.
नेमक्या कोणत्या आजाराचं सावट?
काही महिन्यांपूर्वी राज्यात ‘लम्पी स्कीन’ (Lumpy Skin) आजाराची साथ वाढली होती. यामध्ये अनेक गाय, म्हैस यासारख्या जनावारांच्या त्वचेवर बारीक बारीक गाठी यायच्या, शिवाय यामुळे अनेक जनावरांचा मृत्यू देखील होत होता. काही दिवसांपूर्वी या आजाराची साथ कमी झाली होती, त्यामुळे बळीराजाला मोठा दिलासा मिळाला होता, मात्र आता पुन्हा एकदा या आजाराने डोकं वर काढलं आहे.
पुणे (Pune) शहरातील आंबेगाव परिसरातील घोडेगावमध्ये पुन्हा एकदा ‘लम्पी स्कीन’ सारखा प्रकार आढळून आला आहे, या प्रकारामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. अवकाळी पावसामुळे आधीच काही राज्यांमध्ये शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. शिवाय यंदा मान्सूनमध्ये पाहिजे तसा पाऊस देखील पडलेला नाही, त्यामुळे शेतकऱ्यांसमोर मोठं आव्हान निर्माण झालं होतं, त्यातच आता पुन्हा एकदा ‘लम्पी स्कीन’ सारख्या आजारामुळे शेतकऱ्यांसमोर चिंता निर्माण झाली आहे.
घोडेगाव परिसारातील गावांमध्ये दुग्ध व्यवसाय मोठ्या प्रमाणात केला जातो, त्यामुळे लम्पी आजाराचा थेट परिणाम या व्यवसायावर होण्याची शक्यता आहे. या आजारामुळे जनावरांच्या अंगावर गाठी उद्भवत आहेत. शिवाय या गाठी मोठ्या देखील होत आहेत. हा आजार जास्त वेगाने दुसऱ्या जनावरांमध्ये संक्रमित होत आहे.
Lumpy Skinचा काय परिणाम होतो?
लम्पी आजारामुळे जनावरांवर बारीक गाठी येतात. त्यानंतर त्या गाठी मोठ्या होतात. या शिवाय जनावरांचं वजन कमी होण्यास सुरुवात होऊन त्यांना ताप येतो. त्यानंतर जनावरांच्या डोळ्यातून चिकट पाणी येतं आणि त्यांच्या तोंडातून लाळ देखील गळते. या सर्व त्रासामुळे जनावरे अधिक आजारी पडतात तर काहींचा यामध्ये मृत्यू देखील होतो.
दरम्यान, माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार घोडेगाव परिसरात लम्पी स्कीनच्या प्रदुर्भावाने काही जनावरं बाधीत झाली आहेत. जर योग्य वेळी जनावरांचं लसीकरण केलं नाही, तर हा आजार आणखी वाढू शकतो. लम्पी (Lumpy Skin) हा संसर्गजन्य रोग असून एका जनावराकडून दुसऱ्या जनावराला त्याची लागण होते. गायींना लम्पी रोगाची जास्त लागण होते. कमी वयाच्या जनावरांमध्ये रोगाची तीव्रता जास्त असते.
आपल्या पशुधनाची कशी काळजी घ्याल?
लम्पी रोगाचा प्रादुर्भाव व प्रसार थांबविण्यासाठी मोकाट पशुधनाचे नियमित निरीक्षण करण्यात यावे, तसेच बाधित पशुधनाची काळजी घेऊन त्यांना वेगळे ठेवावे. जनावरांचे गोठे व त्या लगतच्या परिसरात कीटकनाशक फवारणी मोहिम राबविण्यात यावी.
News Title : lumpy Skin Disease found Ambegaon near Pune
थोडक्यात बातम्या-
SBI मध्ये खातं असणाऱ्यांसाठी मोठी बातमी!
Weather update | 24 तासात ‘या’ भागात अतिवृष्टीचा अंदाज, तर काही भागात बर्फवृष्टीचाही इशारा!
Winter session | ‘जय हिंद’,’वंदे मातरम्’, थँक्स सारख्या घोषणांना मज्जाव!, खासदारांसाठी नियमावली जारी
बना Millionaire | तुमचं करोडपती होण्याचं स्वप्न होईल पूर्ण!, हा फॅार्म्युला एकदा वाचाच…
60 टक्के लोक Mumbai सोडण्याच्या विचारात, कारण आहे फारच धक्कादायक