बना Millionaire | तुमचं करोडपती होण्याचं स्वप्न होईल पूर्ण!, हा फॅार्म्युला एकदा वाचाच…

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

नवी दिल्ली | तुमचं करोडपती (Millionaire) होण्याचं स्वप्न पूर्ण होऊ शकतं. तसं पाहायला गेलं तर मोठा निधी जमा होण्यासाठी खूप संयम लागतो. तुम्ही कधी विचार केला आहे की 1 कोटी (1 Crore) रुपये जमा होण्यासाठी किती वेळ लागतो? तुम्ही किती गुंतवणूक (investment) करता आणि तुमच्या गुंतवणुकीवर किती परतावा मिळतो यावर ते अवलंबून असेल. पण तुम्हाला वाटतं तितकं अवघड नाही. थोड्या शिस्तीने आपण दीर्घ मुदतीसाठी आपली बचत सहजपणे दुप्पट किंवा तिप्पट करू शकतो.

कंपाउंडिंग तुम्हाला श्रीमंत कसं बनवू शकतं?

साधं व्याज हे मूळ रक्कम किंवा तुम्ही गुंतवलेल्या पैशावर मोजलं जातं. तर चक्रवाढ व्याजाची गणना मूळ रक्कम आणि त्यावर तुम्हाला मिळणारे व्याज यावर केली जाते. चक्रवाढ ही प्रक्रिया आहे जिथे तुम्ही आधीच जमा केलेल्या व्याजावर व्याज मिळवता.

जाणून घेऊया कंपाउंडिंगचा 8-4-3 नियम?

जर तुम्हाला 1 कोटी रुपये (Millionaire) फार कमी वेळेत जमा करायचे असतील तर तुम्हाला कंपाउंडिंगचा 8-4-3 नियम माहित असला पाहिजे. उदाहरणार्थ जर तुम्ही एसआयपीच्या माध्यमातून म्युच्युअल फंडात दर महिन्याला 21,250 रुपये गुंतवले, ज्यावर वार्षिक 12% व्याज मिळतं आणि वार्षिक चक्रवाढ होते, तर आठ वर्षांत तुमची पहिली ठेव रु. 33.37 लाख असेल.

पुढील 33 लाख रुपये जमा करण्यासाठी केवळ निम्मा म्हणजे चार वर्षे लागतील. तिसरे, तुम्हाला 33.33 लाख रुपये वाचवण्यासाठी फक्त तीन वर्षे लागतील. म्हणजे 15 वर्षांत तुम्ही 1 कोटी रुपये जमा कराल.

तुम्ही तुमच्या 22 व्या वर्षी पोहोचाल तेव्हा चक्रवाढीमुळे 33 लाख रुपये जमा होण्यासाठी फक्त एक वर्ष लागेल. लक्षात ठेवा की आपण वार्षिक चक्रवाढ घेतो, म्हणजेच व्याज वर्षातून एकदा मोजलं जातं.

Formula to become a Millionaire

महत्त्वाच्या बातम्या- 

60 टक्के लोक Mumbai सोडण्याच्या विचारात, कारण आहे फारच धक्कादायक

Weather Update | पुण्यासह ‘या’ 10 जिल्ह्यांना हवामान विभागाचा सर्वात मोठा इशारा!

Exit poll 2023 | काँग्रेसची झोप उडवणारी बातमी समोर!

Kolhapur News | कोल्हापुरातील ‘या’ भागात ढगफुटीसदृश्य पाऊस, रहिवाशांची तारांबळ

LICनं आणली आपली नवी भन्नाट योजना, कमीत कमी गुंतवणुकीत आयुष्यभर मिळणार परतावा!