Kolhapur News | कोल्हापुरातील ‘या’ भागात ढगफुटीसदृश्य पाऊस, रहिवाशांची तारांबळ

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

कोल्हापूर | राज्यात गेले काही दिवस अवकाळी पावसाने (Heavy Rainfall) थैमान घातल्याचं पहायला मिळत आहे. नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात सुद्धा पावसाने राज्यातील काही भागांना अक्षरशः झोडपून काढलं आहे.

याच पार्श्वभूमीवर कोल्हापूरमधून (Kolhapur News) एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. अवकाळी पाऊस सुरु असताना कोल्हापूर येथे ढगफूटी झाल्याचं माध्यमांच्या माहितीनुसार समोर आलं आहे. गेले काही दिवस नाशिकसह मराठवाड्यात पाऊस सुरु आहे. मात्र कोल्हापुरात सुद्धा पावसाने चांगलाच जोर धरला आहे.

कोल्हापूरमध्ये कोणत्या भागात झाली ढगफूटी ?

ऐन हिवाळ्यात महाराष्ट्राच्या काही भागात पावसाचं कमबॅक झाल्याचं चित्र पहायला मिळत आहे. दरम्यान, आज कोल्हापूरमध्ये जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात ढगफुटीसदृश्य पाऊस झाला. त्यामुळे कोल्हापूरकरांमध्ये भीती निर्माण झाली आहे. राज्यात अनेक ठिकाणी पाऊस सुरु आहे. कोल्हापुरात मागील तीन दिवस पावसाने हजेरी लावली आहे.

कोल्हापुरातील कसबा बावड्यातही धुवाँधार पावसाने हजेरी लावली. या बरोबरच हातकणंगलेत ढगफुटीसदृश्य पाऊस झाला आहे. माध्यमांच्या माहितीनुसार, कोल्हापूरच्या मुख्य शहरात आणि आणि उपनगरात पावसाचा एक थेंबही नाही. मात्र अचानक झालेल्या ढगफुटी पावसामुळे कोल्हापूरमधील रहिवाशांची तारांबळ उडाली आहे. 

ऊस गळीत हंगामावर विपरित परिणाम

अवकाळी पावसामुळे राज्यात काही पिकांना चांगलाच फटका बसला आहे. हा पाऊस रब्बी पिकांसाठी चांगला आहे असं म्हटलं जात होतं. मात्र, या पावसामुळे अनेक भागातील शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. यंदा मान्सूनमध्ये पाहिजे तसा पाऊस न पडल्याने शेतकरीराजा समोर संकट उभं होतं. मात्र, अवकाळी पावसामुळे संपूर्ण पिकांची वाट लागल्याने शेतकऱ्यांसाठी आव्हान निर्माण झालं आहे. तर दुसरीकडे अवकाळी पावसाने  होणार आहे.

2 डिसेंबरपर्यंत राज्यात पावसाचा मुक्काम

राज्यातील कोल्हापूर, सोलापूर, सांगली, बार्शी, उस्मानाबाद, लातूर, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, छत्रपती संभाजी नगर, अहमदनगर, अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर या भागात आगामी काळात पाऊस पडण्याची शक्यता आहे. काही भागात 1 डिसेंबरपर्यंत तर काही ठिकाणी 2 डिसेंबरपर्यंत अवकाळी पाऊस पडणार असल्याचा अंदाज आहे. यात राज्यातील पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भासहित विविध भागांमध्ये अवकाळी पाऊस हजेरी लावणार असल्याचा अंदाज आहे.

News Title : Kolhapur News | In this area of ​​Kolhapur, it rain like a cloudburst, the residents were shocked!

थोडक्यात बातम्या-

Maharashtra Rain Update | अवकाळी पाऊस कधीपर्यंत राहणार?, पंजाब डख यांचा अत्यंत महत्त्वाचा अंदाज

Tata Technology च्या शेअरची बाजारात धमाकेदार एंट्री; गुंतवणूकदार झाले मालामाल

Exit poll 2023 | …म्हणून एक्झिट पोल महत्त्वाचे असतात; जाणून घ्या ‘या’ गोष्टी

Maharashtra Weather Update | हवामान विभागाकडून मोठी अपडेट, ‘या’ भागांना गारपीटीचा इशारा

1 डिसेंबरपासून ‘हे’ नियम बदलणार; तुमच्या खिशावर होणार परिणाम