Exit poll 2023 | …म्हणून एक्झिट पोल महत्त्वाचे असतात; जाणून घ्या ‘या’ गोष्टी

Exit poll 2023 | देशातील पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होत आहेत. यापैकी चार राज्यांमध्ये यापूर्वीच मतदान झालं आहे. पाचव्या राज्य तेलंगणामध्ये गुरुवारी मतदान होणार आहे. मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, मिझोराम आणि तेलंगणातील मतमोजणी 3 डिसेंबरला होणार आहे, मात्र त्याआधी राजकारण्यांपासून सर्वसामान्यांपर्यंत सगळेच एक्झिट पोलची वाट पाहत आहेत. या राज्यांमध्ये कोणाचे सरकार बनणार हे एक्झिट पोलमधून काही प्रमाणात स्पष्ट होणार आहे. हा केवळ अंदाज असला तरी अंतिम निकाल निवडणूक आयोगच जाहीर करेल.

पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर करण्यासोबतच निवडणूक आयोगाने 30 नोव्हेंबरला संध्याकाळी 6. 30वाजेपर्यंत एक्झिट पोलवर बंदी घातली आहे. तेलंगणात गुरुवारी मतदान संपताच एक्झिट पोल येतील. पण तुम्हाला माहीत आहे का एक्झिट पोल म्हणजे काय? जगात आणि प्रामुख्याने भारतात पहिल्यांदा कधी वापरण्यात आला? एक्झिट पोल नेहमीच अचूक असतात का? हेच आपण समजून घेऊ.

एक्झिट पोल महत्त्वाचे असतात 

निकडणुकीचे निकाल सांगणं आणि प्रेक्षकांची उत्सुकता भागवणं इतकंच एक्झिट पोलचं काम नसतं. महिलांनी कुणाला मत दिलं, शेतकरी किंवा तरुणांनी कुणाला मत दिलं. कारण निवडणूक आयोग कोण जिंकेल किंवा हारेल, एवढचं सांगतं, पण कुणी कुणाला मत दिलं, हे एक्झिट पोलच सांगू शकतात.

भारतात एक्झिट पोल कधी सुरू झाले?

भारतातील एक्झिट पोल 1996 मध्ये सुरू झाले. सेंटर फॉर द स्टडी ऑफ डेव्हलपिंग सोसायटीज (CSDS) ने हे केले आहे. या एक्झिट पोलमध्ये भारतीय जनता पक्ष (भाजप) लोकसभा निवडणूक जिंकेल असा अंदाज वर्तवण्यात आला होता. भाजपने प्रत्यक्षात निवडणूक जिंकली, पण एक्झिट पोलच्या निकालांनी निवडणूक निकालांवर परिणाम केला. यानंतर भारतात एक्झिट पोलचा कल वाढला आहे. एक्झिट पोल नेहमीच अचूक नसतात. एक्झिट पोलच्या निकालांवर परिणाम करणारे अनेक घटक आहेत.

एक्झिट पोलबाबत काय नियम आहेत?

मतदानाच्या दिवशी एक्झिट पोलचे निकाल प्रसारित करता येणार नाहीत.

मतदानानंतर एक्झिट पोलचे निकाल प्रसारित करण्यासाठी सर्वेक्षण संस्थेला निवडणूक आयोगाची परवानगी घ्यावी लागेल.

एक्झिट पोलचे निकाल प्रसारित करताना, सर्वेक्षण एजन्सीने हे स्पष्टपणे नमूद केले पाहिजे की हे निकाल केवळ अंदाज आहेत.

How true and how false is the prediction of exit polls?

महत्त्वाच्या बातम्या- 

Maharashtra Weather Update | हवामान विभागाकडून मोठी अपडेट, ‘या’ भागांना गारपीटीचा इशारा

1 डिसेंबरपासून ‘हे’ नियम बदलणार; तुमच्या खिशावर होणार परिणाम

Team India साठी सर्वात मोठी बातमी!

Randeep Hooda | रणदीप हुडा अडकला लग्नबंधनात, पाहा व्हिडीओ

ठाकरे गट मोठ्या अडचणीत; ‘ती’ एक चूक पडू शकते महागात