Team India साठी सर्वात मोठी बातमी!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

मुंबई | आयसीसी वर्ल्डकप 2023 च्या फायनलमध्ये भारतविरोध ऑस्ट्रेलिया यांच्यात सामना झाला. यामध्ये टीम इंडियाचा पराभाव झाला. त्यानंतर टीम इंडीयाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांचा कार्यकाळ संपला. 2019 मध्ये राहुल द्रविड यांची टीम इंडियासाठी प्रशिक्षक म्हणून निवड करण्यात आली होती. आता त्यांचा करार संपला आहे.

दरम्यान, नुकत्याच पार पडलेल्या आयसीसी वर्ल्डकपनंतर द्रविड यांचा करार संपला आणि त्यांनी आपल्या प्रशिक्षक पदाचा राजीनामा दिला. मात्र टीम इंडियाला लवकरात लवकार नव्या प्रशिक्षकाची गरज असल्यामुळे आज बीसीसीआयने टीम इंडीयाच्या प्रशिक्षकाबाबत बैठक घेत मोठा निर्य घेतला आहे.

बीसीसीआयने कोणता निर्णय घेतला?

राहुल द्रविड यांनी पुन्हा हेड कोच होण्यास पसंती दर्शवली नाही. त्यांनी ऑफर नाकारली. मात्र आता बीसीसीआयने हेड कोच राहुल द्रविड यांच्यासह संपूर्ण सपोर्ट स्टाफचा कार्यकाळ वाढवण्यात आला आहे. बीसीसीआयने सोशल मीडियावरुन याबाबतची माहिती दिली आहे. यानंतर राहुल द्रविड यांनी साऱ्या भारताला आश्वासन दिलं आहे.

राहुल द्रविड यांचा हेड कोच म्हणून कार्यकाळ संपताच व्हीव्हीएस लक्ष्मण याचं नाव हे चर्चेत होतं. व्हीव्हीएस लक्ष्मण यांच्याकडे ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी टीम इंडियाचं प्रशिक्षकपद आहे. त्यामुळे लक्ष्मण टीम इंडियाचे हेड कोच असणार अशी चर्चा होती. मात्र बीसीसीआयने मुदतवाढ दिल्याने लक्ष्मणच्या नावाच्या चर्चांना अधिकृत पूर्णविराम मिळाला आहे.

द्रविड यांना प्रशिक्षकपदी ठेवण्यामागचं कारण काय?

द्रविड ज्या रचनेवर गेली दोन वर्षे सातत्याने काम करत आहे, त्यात सातत्य राखणं हेच त्याचं उत्तर आहे. त्यात राहुल द्रविडने महत्त्वाची भूमिका बजावली असल्याने त्यांच्या जाण्याने त्यात कोणताही अडथळा निर्माण होऊ नये, असं बीसीसीआयला वाटत आहे.

News Title : The biggest news for Team India, ‘this’ cricketer has been selected as a coach

थोडक्यात बातम्या- 

ठाकरे गट मोठ्या अडचणीत; ‘ती’ एक चूक पडू शकते महागात

Maharashtra Weather Alert | हवामान विभागाकडून ‘या’ भागांना अलर्ट जारी

Animal Movie | रणबीर कपूरच्या ‘Animal’ चित्रपटाला रिलीजपूर्वीच मोठा झटका!

शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी! ‘या’ शेतीसाठी मिळतंय एकरी 4 लाखांचं अनुदान

Nashik Heavy Rainfall | शेतात पाऊल ठेवताच बळीराजा ढसाढसा रडला, समोर बघितलं तर दिसलं…