शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी! ‘या’ शेतीसाठी मिळतंय एकरी 4 लाखांचं अनुदान

मुंबई | शेतकऱ्यांसाठी (Farmers) आनंदाची बातमी समोर आली आहे. रेशीम शेतीसाठी (Sericulture) मनरेगाच्या अंतर्गत एक एकराच्या लागवडीसाठी चार लाखांचं अनुदान दिलं जात आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या खर्चात मोठी बचत होईल.

Good news for farmers 

महारेशीम अभियानांतर्गत रेशीम शेतीत सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांना 20 डिसेंबर पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत देण्यात आली आहे. या अनुषंगाने रेशम कार्यालयासह मनरेगाची यंत्रणा महसूल व कृषी विभागात शेतकऱ्यांचा सहभाग वाढवण्यासाठी अधिकारी प्रयत्नशील आहेत. त्यामुळे रेशीम शेतीच्या अधिक माहितीसाठी महसूल कृषी विभाग किंवा रेशीम कार्यालयाला भेट द्या, असं आवाहन करण्यात आलंय.

या योजनेत सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांना एक एकराच्या मर्यादेत पहिल्यावर्षी अकुशल मजुरी 1 लाख 26 हजार 720 रुपये तर कुशलसाठी 93 हजार 210 रुपये, असे एकूण 2 लाख 19 हजार 930 रुपये मिळतात.

अशी आहे योजना 

रेशीम शेतीचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी हा अल्पभूधारक असणं आवश्यक आहे. अनुसूचित जाती जमातीतील महिलांना प्राधान्य असेल. तर सिंचनाची बारमाही किंवा किमान आठमाही सोय असावी. मनरेगा कृती आराखडा व ग्रामसभेचा ठराव आवश्यक आहे आणि लाभार्थी हा जॉब कार्डधारक असावा. रेशीम शेतीच्या अनुदानाची रक्कम ही तीन वर्षांमध्ये वितरित करण्यात येते.

कमी खर्चात करता येते रेशीम शेती 

दरम्यान, रेशीम उत्पादन हा शेतीस पूरक व्यवसाय आहे. दुग्ध व्यवसाय आणि कुक्कुट पालन व्यवसाय याप्रमाणे हा व्यवसाय, अत्यंत कमी खर्चात व शेतकऱ्यांकडे उपलब्ध असलेल्या साहित्यातून करता येतो. नवीन तुती लागवड पद्धत व नवीन किक संगोपन पद्धत यामुळे हा व्यवसाय कमी मजूरात मोठया प्रमाणात करता येतो.

रेशीम वस्त्राला देशात आणि आपल्या राज्यात प्रचंड मागणी आहे. ती मागणी दरवर्षी 16 ते 20 टक्क्यांनी वाढ्त आहे. स्वयंरोजगार निर्मितीची प्रचंड ताकद या रेशीम शेतीत आहे. तुती लागवडीद्वारे पर्यावरणाचे रक्षण, रेशम कोटक संगीपन, धागा व वस्त्र निर्मितीं, स्वयरोजगार निर्मिती तसेंच ग्रामीण भागातून शहरी भागाकडे होणारे स्थलांतर रेशीम शेती उद्योगामुळे थाबवता येते. महाराष्ट्रात एक एकरातील तुती लागवडीद्वारे वर्षभरात लक्षाधीश झालेल्या शेतकऱ्यांची नोंद आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

Nashik Heavy Rainfall | शेतात पाऊल ठेवताच बळीराजा ढसाढसा रडला, समोर बघितलं तर दिसलं…

Video | शाळकरी पोरांचे अश्लील चाळे, दोन मुलींना Kiss करताना दिसला, पाहा व्हिडीओ

LIC Pension Scheme | …तर निवृत्तीनंतर दर महिन्याला 28,000 पेन्शन मिळेल, LIC ची भन्नाट योजना

Nita Ambani | नीता अंबानींकडे आहे जगातील सर्वात महागडा फोन; किंमत वाचून थक्क व्हाल

Maharashtra Rain Alert | येत्या 48 तासात ‘या’ भागात वादळीवाऱ्यासह पावसाचा इशारा