Maharashtra Rain Alert | येत्या 48 तासात ‘या’ भागात वादळीवाऱ्यासह पावसाचा इशारा

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

मुंबई | महाराष्ट्रात (Maharashtra Rain Alert) गेले काही दिवस अवकाळी पावसाने चांगलाच राडा घातला आहे. याचा फटका शेतातील पिकांना बसला. तर काही भागात वादळीवाऱ्यासह गारपीटांचा पाऊस (Heavy Rainfall) झाला आहे. याच पार्श्वभूमीवर हवामान विभागाने एक महत्त्वाचा इशरा दिला आहे.

हवामान विभागाने कोणता इशारा दिला?

राज्यात सुरु असलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे. तर काही भागात गारपीटामुळे रब्बी पिकांना (Rabbi Crops) फटका बसला आहे. नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात पावसाने कमबॅक केलं आहे. दरम्यान हवामान विभागाने (Department of Meteorology) एक महत्त्वाची माहिती दिली आहे. पुढील 48 तासात राज्याच्या काही भागात पाऊसाची शक्यता जारी केली आहे.

या सोबतच राज्यातील अनेक ठिकाणी हलक्या आणि मध्यम सरी बरसतील. मात्र, काही ठिकाणी गारपीट हाऊ शकतो, असा अंदाज देखील हवामान विभागाने वर्तवला आहे. हा अंदाज विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रासाठी लागू असेल. भारतातील अवकाळी पाऊस अलीकडच्या काळात शेतकऱ्यांसाठी चिंतेचा विषय बनला आहे.

यंदा मान्सून (Monsoon) पाहिजे तसा पडला नाही त्यामुळे शेतकरी चिंतेत होते. राज्यात अनेक ठिकाणी ऐन पावसाळ्यात दुष्काळस्थिती पाहायला मिळाली होती. मात्र आता होत असलेल्या पावसामुळे काही भागात शेतीचं मोठं नुकसान झाल्याने शेतकऱ्यांसाठी मोठं आव्हन निर्माण झालं आहे.

राज्याच्या कोणत्या भागात अवकाळी पाऊस होणार?

हवामान विभागाकडून मिळालेल्या माहितीनूसार, विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रामध्ये विजांचा सोसाट्याचा वारा, विजांचा गडगडाटांसह पावसाची हजेरी पाहायला मिळेल. पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात साधारण बारीक सरींचा पाऊस पाहायला मिळेल. तर अंदमान निकोबार बेटांवर मुसळधार पावसाची शक्यता पाहायला मिळू शकेल, असा अंदाज आयएमडीने वर्तवला आहे.

दरम्यान, दक्षिण अंदमान समुद्रालगतच्या भागामध्ये हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने देशाच्या विविध भागात पावसाची स्थिती पाहाला मिळत आहे. याच बरोबर सुरु असलेल्या पावसाची शक्यता बघून हवामान विभागाने राज्याच्या काही भागांना यलो अर्लट जारी केला आहे.

कोणत्या ठिकाणी येलो अर्लट जारी करण्यात आला आहे?

पावसाची शक्यता पाहता हवामान विभागाने बीड, धाराशिव, लातूर, परभणी, अकोला, हिंगोली, अमरावती, नागपूर, जालना, नांदेड, गोंदिया आदी जिल्ह्यांमध्ये ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे. डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीस बंगालच्या उपसारगात चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यताही हवामान विभागाने वर्तवली आहेत. परिणामी पुढचा काही काळ शेतकऱ्यांसाठी चिंतेचा आणि नागरिकांसाठी आरोग्याच्या दृष्टीने काळजी घेण्याचा ठरणार आहे.

News Title : Maharashtra Rain Alert | Rain warning with hail in ‘this’ area in next 48 hours

थोडक्यात बातम्या-

ब्राझिलियन फळाची लागवड, महाराष्ट्रातील शेतकऱ्याने कमावले 4 लाख रुपये

मोठी बातमी! Antarwali Sarathi प्रकरणातील आरोपी पोलिसांच्या ताब्यात

मामा असावा तर असा….; भाचीच्या लग्नात ‘इतके’ कोटी कॅश घेऊन पोहोचला, लोक पाहतच राहिले

Maharashtra Rain Update | पुढील 5 दिवस असा असेल पाऊस, महाराष्ट्रातील ‘या’ भागांना इशारा

Tractor Sales | शेतकरी राजाची ट्रॅक्टरकडे पाठ, ट्रॅक्टरच्या विक्रीत झाली घट… नेमकी काय आहेत कारणं?