मामा असावा तर असा….; भाचीच्या लग्नात ‘इतके’ कोटी कॅश घेऊन पोहोचला, लोक पाहतच राहिले

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

नवी दिल्ली |  भारतात लग्न म्हटलं की सगळे विचारतात किती खर्च आला. त्याला कारणंही तसंच आहे. आपल्याकडे लग्न म्हटलं की भरपूर पैसा उधळला जातो. अनेकदा या महागड्या लग्न समारंभांची चर्चाही होते. सध्या अशाच एका लग्नाची चर्चा संपूर्ण देशभरात होत आहे. हरियाणाच्या रेवाडीमध्ये एका मामाने आपल्या भाचीच्या लग्नात असं काही केलंय की ज्याची देशभरात चर्चा होत आहे.

भावाने 500-500 रुपयांच्या नोटांचे बंडल त्याच्या विधवा बहिणीच्या घरी नेले. सतबीर असं या व्यक्तीचं नाव असून तो क्रेन व्यावसायिक आहे. एवढंच नाही तर सतबीरने आपल्या भाचीच्या लग्नासाठी करोडो रुपयांचे दागिनेही दिले आहेत. सतबीरने एकूण 1 कोटी 1 लाख 11 हजार 101 रुपये शगुन म्हणून दिले.

सतबीर आपल्या कुटुंबासह गावातच राहतो. चांगल्या जमिनीचा मालक सतबीर सुरुवातीपासूनच आपल्या बहिणीला मदतीचा हात देत आले आहेत. तांदूळ देताना बनवलेल्या व्हिडीओमध्ये रोख रक्कम आणि दागिन्यांची बंडल दिल्याचा व्हिडीओही समोर आला आहे. नोटांच्या बंडलांची सोशल मीडियावर बरीच चर्चा आहे. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे. तसेच अनेकांनी यावर कमेंट केल्या. मामा असावा तर असा असं काहींनी म्हटलंय.

Haryana rewari Shagun Ceremony Viral Video 

असलवास हे रेवाडी जयपूर-दिल्ली हायवेला लागून असलेलं गाव आहे. येथे राहणाऱ्या सतबीरच्या बहिणीचं लग्न सिंदरपूर येथे झालं होतं. लग्नानंतर काही काळाने तिच्या पतीचं निधन झालं. सतबीरच्या बहिणीला एक मुलगी आहे. भाचीच्या लग्नाआधी सतबीर गावातील लोकांसह बहिणीच्या घरी शगुन देण्यासाठी पोहोचला होता.

नोटांचे बंडल लोक पाहतच राहिले 

शगुन विधी सुरू झाला तेव्हा तेथे उपस्थित असलेले लोकही आश्चर्यचकित झाले. सतबीरने आपल्या बहिणीच्या घरी 500 रुपयांच्या नोटा भरल्या. सतबीरने एकूण 1 कोटी 1 लाख 11 हजार 101 रुपयांच्या रोख रकमेशिवाय कोट्यवधी रुपयांचे सोन्याचे दागिने आणि इतर वस्तूही भाचीला दिल्या.

राजस्थानमध्येही मामाने भाचीला दिलेले 3 कोटी

राजस्थानच्या नागौर जिल्ह्यातील अशीच घटना घडली होती. नवरीच्या मामाने तिला तब्बल 3 कोटी रुपयांच्या भेटवस्तू लग्नात दिल्या होत्या. त्यात 81 लाख रुपये रोख रक्कम, दागिने, जमिनीची कागदपत्रे आणि बरंच काही होते. हे पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटलं. नागौरमध्ये रिंगरोडवर एक प्लॉट भाचीच्या नावावर केला होता. त्याची किंमत सुमारे 30 लाख रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. याशिवाय 40 तोळं सोनं आणि तीन किलो चांदीही भेट म्हणून देण्यात आली. तसेच, धान्याने भरलेली ट्रॉली ट्रॅक्टर आणि स्कूटीही त्यांनी दिली होती.

महत्त्वाच्या बातम्या- 

Maharashtra Rain Update | पुढील 5 दिवस असा असेल पाऊस, महाराष्ट्रातील ‘या’ भागांना इशारा

Tractor Sales | शेतकरी राजाची ट्रॅक्टरकडे पाठ, ट्रॅक्टरच्या विक्रीत झाली घट… नेमकी काय आहेत कारणं?

मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या संपत्तीचा आकडा समोर

Uttarkashi Tunnel Rescue | ‘ती’ एक गोष्ट ठरली वरदान; उत्तरकाशीतून मोठी अपडेट समोर

Pune Crime | माणुसकीला काळीमा फासणारं कृत्य; मुक्या जीवावर गोळीबार