Pune Crime | माणुसकीला काळीमा फासणारं कृत्य; मुक्या जीवावर गोळीबार

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

पुणे | पुण्यात (Pune Crime) गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारी वाढली आहे. शिवाय या शहरात छोट छोट्या कारणावरुण वाद, हाणामारी होत असताना दिसत असते. मात्र, पुण्यात अणखी एक धक्कादायक प्रकार घडला आहे.

Pune crime an incident that blackens humanity due to this reason a dog get fired

काय घडलं पुण्यात?

पुण्याच्या हडपसर (Hadapsar) परिसरातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुण्यात बहुतांश लोकांना पाळीव प्रण्यांचा (Pet Animal) त्रास होतो. याच त्रासातून हडपसर भागात एकाने रागाच्या भरात कुत्र्यावर (Dog Fired) चक्क स्पोर्ट्स गनमधून गोळीबार केला.

कुत्र्यावर गोळीबार करण्यामागचं कारण काय?

पुण्यात हडपसर येथील “इन्केव्ह लोकमंगल सोसायटी” झेड कॉर्नर, मांजरी बुद्रुक येथे एका कुटुंबाने बाऊंसी (Bouncy) नावाची कुत्री पाळली होती. दरम्यान, कुत्र (Dog) नेहमी त्रास देतो सतत भूकंत असतं, या कारणावरून आरोपीने त्याच्याकडे असलेल्या स्पोर्ट्स गनने गोळीबार केला. त्यामुळे या श्वानाला गंभीर इजा झाली. यात कुत्री गंभीर जखमी झाली असून तो विकलांगदेखील (Handicap) झाला आहे.

कुत्र्याला एअरगनचा छऱ्या मारून जखमी केलं. या प्रकरणी हडपसर पोलीस स्टेशन (Hadapsar Police Station) मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अली रियाज थावेर या आरोपीस ताब्यात घेतलं आहे. कुत्र्याच्या मालकाने त्यानंतर पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर गोळीबार करणाऱ्या अली रियाज थावेर याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पुण्यात अशा अनेक घटाना घडल्या आहेत. कोंढवा (Kondhwa) परिसरात एका कुत्र्याला चक्क विष (Poison) पाजून लाठीने मारण्याचा प्रयत्न केला झाला होता. कुत्र्याला सोसायटीच्या मैदानात प्रवेश करण्यापासून रोखण्यासाठी हा प्रकार करण्यात आलेला. गेल्या काही दिवसांपूर्वी कोंढवा येथे कुत्र्याला सोसायटीमध्ये प्रवेश करण्यापासून रोखलं असतानाही कुत्र आत आलं म्हणून, कुत्र्याला मारहाण करुन विष देऊन ठार मारल्याची धक्कादायक घटना समोर आली होती.

कोंढव्यातील अतूर व्हिला विस्टा सोसायटीच्या सुरक्षारक्षक आणि इतर तीन लोकांविरुद्ध तक्रार दाखल केली होती. सकाळच्या सुमारास अमीर खान याने कुत्र्याचा वेदनांनी रडण्याचा आवाज ऐकला. तो त्वरीत बाल्कनीकडे धावला जिथे त्याला काही लोक लाठी मारताना दिसले होते. कुत्र्याला मारहाण करु नका असं खान आणि त्याच्या आईने आरोपींना समजावण्याचा प्रयत्न केला.

मात्र चौघेही यांचं ऐकायला तयार नव्हते. त्यानंतर खान आणि त्याच्या आईने या घृणास्पद कृत्याची नोंद केली आणि अॅनिमल वेल्फेअर बोर्ड ऑफ इंडियाशी संपर्क साधला. थोड्याच वेळात, एक प्राणी मित्र दाखल झाला आणि परिस्थिती पाहिली. त्यावेळी कुत्र्याचा मृत्यू झाला होता.

थोडक्यात बातम्या-

Manoj Jarange Patil यांनी घेतली माघार; केलं ‘हे’ मोठं वक्तव्य

Skin Care | चेहऱ्यावर Beer लावल्याने होतात ‘हे’ फायदे

Tesla ची सर्वात स्वस्त कार भारतात येणार, जाणून घ्या किंमत

HDFC Bank | एचडीएफसी बँकेच्या ग्राहकांसाठी मोठी गुड न्यूज!

Shah Rukh Khan | प्रसिद्ध गायकाचं शाहरुख खानबाबत खळबळजनक वक्तव्य!