Skin Care | चेहऱ्यावर Beer लावल्याने होतात ‘हे’ फायदे

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

मुंबई | बिअर (Beer) पिणं आपल्या लिव्हरसाठी धोकादायक ठरू शकतं, पण बीअर चेहऱ्यावर लावल्याने त्वचा निरोगी आणि चमकदार होते. बिअर त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर ठरते. चेहऱ्यावर बिअर (Beer)  लावल्याने त्वचा चमकू लागते आणि पिंपल्सची समस्याही दूर होते.

Applying beer on the skin makes the skin glow

युरोपियन अॅकॅडमी ऑफ डर्मेटोलॉजी अँड वेनेरिओलॉजीच्या संशोधनानुसार, बिअरमध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत जे त्वचेला चमकदार बनवण्यास मदत करतात. मुरुमांची समस्या बिअर लावूनही कमी करता येते. वास्तविक, बिअर बनवण्याची पद्धत आणि त्यात वापरलेले घटक त्वचेसाठी फायदेशीर आहेत.

हॉप्स नावाच्या फुलाचा वापर बीअर बनवण्यासाठी केला जातो ज्यामध्ये अँटी-बॅक्टेरियल, अँटी-इंफ्लेमेटरी, अँटी-ऑक्सीडेटिव्ह, अँटी-मेलानोजेनिक यांसारख्या गुणधर्मांचा समावेश असतो. ही सर्व पोषकतत्वे त्वचा निरोगी ठेवण्यास मदत करतात. चेहऱ्यावर बीयरचा वापर करून बॅक्टेरियाचा संसर्ग आणि सूज देखील कमी केली जाऊ शकते.

चेहऱ्यावर बिअर लावल्याने हे फायदे होतात 

चेहऱ्यावर बिअर लावल्याने बॅक्टेरियाचा संसर्ग कमी होतो, ज्यामुळे पिंपल्सची समस्या दूर होते.

चेहऱ्यावर डेड स्किन असल्यास बीअरचा वापर करता येतो. यात लैक्टिक ऍसिड असते जे मृत पेशी काढून टाकण्यास मदत करतं.

बिअरमध्ये हायड्रोक्विनोन नावाचं संयुग असतं, जे हायपरपिग्मेंटेशन कमी करतं.

दररोज बिअर त्वचेवर लावल्याने त्वचा चमकदार होते.

असा करा बिअरचा वापर

तुम्ही बीअर आणि खोबरेल तेलाचे मिश्रण चेहऱ्यावर लावू शकता. यासाठी 1 चमचा बिअर आणि 1 चमचा खोबरेल तेल मिसळा. आता ते संपूर्ण चेहऱ्यावर लावा. ते सुकल्यावर कोमट पाण्याने चेहरा धुवा.

महत्त्वाच्या बातम्या- 

Tesla ची सर्वात स्वस्त कार भारतात येणार, जाणून घ्या किंमत

HDFC Bank | एचडीएफसी बँकेच्या ग्राहकांसाठी मोठी गुड न्यूज!

Shah Rukh Khan | प्रसिद्ध गायकाचं शाहरुख खानबाबत खळबळजनक वक्तव्य!

Maratha Reservation Update | मराठा आरक्षणाबाबत मोठी बातमी समोर!

रिकाम्यापोटी तूप खातात या अभिनेत्री, फायदे ऐकाल तर तुम्हीही सुरु कराल!