Manoj Jarange Patil यांनी घेतली माघार; केलं ‘हे’ मोठं वक्तव्य

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

मुंबई | मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी गेल्या काही दिवसांपासून राज्य दौरा सुरु केला आहे. मराठा समाजाला (Maratha Reservation) आरक्षण मिळवून देण्यासाठी जरांगे पाटलांनी सभांचा धडाका लावलाय. आधी 35 उपोषण (Hungry Strike), त्यानंतर आंदोलन आणि आता महाराष्ट्रभर (Maharashtra) जाहीर सभा. त्यामुळे जरांगे पाटील यांना अनेक राजकीय नेते मंडळी पाठिंबा देत आहेत.

Manoj Jarange Patil withdrew

जरांगे पाटील यांनी कल्याण (Kalyan), ठाणे(Thane), मुंबई(Mumbai), सातारा (Satara), पुणे (Pune), नगर (Nagar) या सारख्या भागात जाऊन जाहिर सभा घेतली. त्यांच्या सभेला मराठा बांधवांनी पाठींबा देखील दिला. सभेत बोलत असताना जरांगे पाटलांनी राजकीय नेते मंडळींवर निशाणा साधला. यामध्ये अन्न नागरी पुरवठा मंत्री (Minister of Food Civil Supplies) आणि राष्ट्रवादी (NCP) अजित पवार (Ajit Pawar) गटाचे नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्यावर सुद्धा हल्लाबोल केला.

दरम्यान, पुणे (Pune) येथे जरांगे पाटील यांची सभा पार पडली. पुण्याच्या खराडी (Kharadi) येेथे सभेत बोलत असताना जरांगे पाटलांनी भुजबळांवर निशाणा साधला. शिवाय लायकी या शब्दाचा उचार केल्याने जरांगे पाटील वादाच्या भवऱ्यात सापडले.

काय म्हणाले जरांगे पाटील?

मनोज जरांगे पाटील आणि मंत्री छगन भुजबळ यांच्यात वाकयुद्ध रंगलंय. तर लायकी नसलेल्यांच्या हाताखाली काम करावं लागतंय, असं वक्तव्य मनोज जरांगे पाटील यांनी पुण्यातील खराडी येथील सभेत केलं होतं.

मात्र आता याच वक्तव्यावरून मनोज जरांगे पाटील यांनी माघार घेतली आहे. लायकी या शब्दावरून छगन भुजबळ यांच्यावर केलेली टीका आणि तो शब्द जरांगे यांनी जाहीरपणे मागे घेतला असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

मनोज जरांगे पाटील यांना त्या टीकेबाबत सवाल केला असता, मनोज जरांगे पाटील म्हणाले, “तुम्ही सारखं ते लावून का धरलं मला माहिती नाही. पण मी माझे शब्द मागे घेतो, असे जरांगे पाटील म्हणाले.”

दरम्यान, जरांगे पाटलांनी सरकारला 24 डिसेंबरपर्यंत आरक्षणाविषयी मुदत दिली आहे. त्यामुळे सरकार कोणता निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. तर दिल्ली येथे हालचालींना वेग आलाय. संभाजीराजे राजधानी दिल्लीत दाखल झाले आहेत. मराठा समाजाच्या शिष्टमंडळासह संभाजीराजे केंद्रीय मागासवर्ग आयोगाची भेट घेणार आहेत.

थोडक्यात बातम्या-

Tesla ची सर्वात स्वस्त कार भारतात येणार, जाणून घ्या किंमत

HDFC Bank | एचडीएफसी बँकेच्या ग्राहकांसाठी मोठी गुड न्यूज!

Shah Rukh Khan | प्रसिद्ध गायकाचं शाहरुख खानबाबत खळबळजनक वक्तव्य!

Maratha Reservation Update | मराठा आरक्षणाबाबत मोठी बातमी समोर!

रिकाम्यापोटी तूप खातात या अभिनेत्री, फायदे ऐकाल तर तुम्हीही सुरु कराल!