“6 डिसेंबरनंतर देशात कधीही काहीही होऊ शकतं”; ‘या’ बड्या नेत्याच्या वक्तव्याने खळबळ

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

मुंबई | वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी पुण्यात बोलत असताना मोठा दावा केला आहे. 6 डिसेंबरनंतर देशात काहीही होऊ शकतं, असं वक्तव्य प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे. तर देशातील पाच राज्यातील निवडणुकांच्या निकालानंतर देशात काहीही परिस्थिती उद्भवू शकते, अशी शंकाही प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केली आहे.

Big statement of Prakash Ambedkar

महात्मा फुले यांचा आज स्मृतीदिन. त्यानिमित्त प्रकाश आंबेडकर यांनी पुण्यातील भिडे वाड्याला भेट दिली. महात्मा फुले यांच्या स्मृतींना अभिवादन केलं. यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी माध्यमांशी संवाद साधला. तेव्हा वेगवेगळ्या विषयांवर त्यांनी भाष्य केलं. यावेळी बोलताना प्रकाश आंबेडकरांनी मोठा दावा केला तसेच केंद्र सरकारवरही सडकून टीका केलीये.

 “देशात सत्ता बदललेल”

मुस्लिम आणि ओबीसी आरक्षण टार्गेट केलं जातंय. देशात सत्ता बदललेलं पण पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी राहणार नाहीत, हे मात्र नक्की आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वेगळी भूमीका घेतात. आणि परराष्ट्रमंत्री वेगळा निर्णय युद्धाबाबत घेत आहेत, असंही त्यांनी म्हटलंय.

आज देशात हिंदू असूनही देशात पुन्हा वैदिक परंपरा सुरू कराव्या अशी मागणी होत आहे. आरआरएस किंवा विश्व हिंदू परिषद म्हटलं नसलं तरी देवेंद्र फडणवीस यांनी जे वक्तव्य केलं आहे की, संविधान बदलणार नाही. पण जोपर्यंत आरआरएसचे प्रमुख मोहन भागवत हे जोपर्यंत असं वक्तव्य करत नाही. तोवर आम्ही मान्य करणार नाही, असंही प्रकाश आंबेडकर म्हणालेत.

“छगन भुजबळ यांना मी जेलबाहेर काढलं”

प्रकाश आंबेडकरांनी यावेळी मंत्री छगन भुजबळांवर देखील निशाणा साधला. छगन भुजबळ यांना जेलबाहेर काढणारा मीच आहे. मी जर न्यायाधीशांना शिव्या घातल्या नसत्या तर भुजबळ जेलबाहेर आले नसते, असं त्यांनी सांगितलं.

महत्त्वाच्या बातम्या- 

Manoj Jarange Patil यांनी घेतली माघार; केलं ‘हे’ मोठं वक्तव्य

Skin Care | चेहऱ्यावर Beer लावल्याने होतात ‘हे’ फायदे

Tesla ची सर्वात स्वस्त कार भारतात येणार, जाणून घ्या किंमत

HDFC Bank | एचडीएफसी बँकेच्या ग्राहकांसाठी मोठी गुड न्यूज!

Shah Rukh Khan | प्रसिद्ध गायकाचं शाहरुख खानबाबत खळबळजनक वक्तव्य!