Tractor Sales | शेतकरी राजाची ट्रॅक्टरकडे पाठ, ट्रॅक्टरच्या विक्रीत झाली घट… नेमकी काय आहेत कारणं?

नवी दिल्ली | बैलांच्या मदतीने शेतातील कामं करुन घेण्याचे दिवस गेले. शेतीत यांत्रिकीकरणामुळे मोठे बदल पहायला मिळाले. यातील सर्वात मोठा बदल म्हणजे ट्रॅक्टरच्या सहाय्याने केली जाणारी शेती. (Indian Farming) सणासुदींच्या काळात शेतकरी वर्गाकडून मोठ्या प्रमाणात ट्रॅक्टरची खरेदी (Tractor Sales) झाल्याचे याआधी पहायला मिळाले आहे.

ट्रॅक्टरच्या विक्रीबाबत आता मात्र एक धक्कादायक माहिती हाती आली आहे. नुकत्याच हाती आलेल्या माहितीनूसार ट्रॅक्टरच्या विक्रीत घट झाल्याचं समोर आलं आहे. यामागे नक्कीच काही महत्त्वाची कारणं आहेत.

कोणत्या कारणामुळे ट्रॅक्टर खरेदीत झाली घट?

ट्रॅक्टर विक्रीत ०.५ टक्के घट आली आहे, महत्त्वाची बाब म्हणजे ऐन सणांच्या काळात हा प्रकार घडला आहे. यंदाचा मॉन्सून (Monsoon) शेतकऱ्यांसाठी चांगला ठरला नाही. ऐन हंगामात पावसाने दडी मारलेली पहायला मिळाली. पर्यायाने शेती क्षेत्रावर मोठं संकट घोंघावू लागलं होतं, त्याचाच परिणाम ट्रॅक्टरच्या विक्रीवर झाल्याचं दिसतंय.

मान्सूनने दडी मारल्याचा परिणाम म्हणजे ४२ दिवसात ट्रॅक्टरची विक्री घटली आहे. तसं पहायला गेलं तर सणांच्या काळात देशात ट्रॅक्टरची विक्री वाढत होत असते. परंतु यंदा मात्र ट्रॅक्टर विक्रीत घट नोंदवली गेली आहे. फेडरेशन ऑफ ऑटोमोबाइल डिलर्स असोसिएशनच्या माहितीनुसार, २०२२ या वर्षात सणांच्या काळात ८६ हजार ९५१ ट्रॅक्टरची विक्री झाली होती, तर २०२३ वर्षात सणांच्या काळात ८६ हजार ५७२ ट्रॅक्टरची विक्री झाली आहे.

Tractor sales dip this festival season

दरवर्षी ट्रॅक्टरच्या विक्रीत काही टक्क्यांची वाढ अपेक्षित असते, यंदा मात्र ती पहायला मिळाली नाही. गेल्या वर्षीच्या तुलनेत अजूनही यंदाच्या वर्षीची ट्रॅक्टर खरेदी कमी असल्याचं पहायला मिळत आहे. यंदा ट्रॅक्टर विक्रीला सर्वात मोठा फटका नवरात्रीच्या (Navratri Festival Season) काळात बसला होता, या काळात ट्रॅक्टर विक्रीत ८.३ टक्क्यांची घट झाली होती, मात्र ग्रामीण भागातून शेवटच्या टप्प्यात ट्रॅक्टरच्या विक्रीत वाढ झाल्याचं पहायला मिळालं. शेवटी सणांच्या काळातील ट्रॅक्टर विक्रीतील घट फक्त ०.५ टक्के नोंदवली गेली.

आगामी काळात कशी असेल ट्रॅक्टर खरेदी?

देशांतर्गत ट्रॅक्टरच्या मागणीत आर्थिक वर्ष २०२४ मध्ये तीन ते पाच टक्क्यांची वाढ अपेक्षित आहे. केंद्र सरकारकडून कृषि यांत्रिकीकरणाला चालना देण्याचे प्रयत्न सुरु आहेत. गेल्या वर्षी ट्रॅक्टरची विक्री चांगली राहिली होती. त्या तुलनेत चालू आर्थिक वर्षात वाढ अपेक्षित होती, मात्र मान्सूनच्या लहरीपणामुळे मागणीत घट होण्याची शक्यता आहे. उत्तर भारतात सुद्धा पुरानं थैमान घातलेलं आहे तर दक्षिणेत पुरेसा पाऊस झालेला नाही, त्याचा परिणाम ट्रॅक्टरच्या खरेदीवर होऊ शकतो, असं कृषी क्षेत्रातील जाणकारांचं मत आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या संपत्तीचा आकडा समोर

Uttarkashi Tunnel Rescue | ‘ती’ एक गोष्ट ठरली वरदान; उत्तरकाशीतून मोठी अपडेट समोर

Pune Crime | माणुसकीला काळीमा फासणारं कृत्य; मुक्या जीवावर गोळीबार

“6 डिसेंबरनंतर देशात कधीही काहीही होऊ शकतं”; ‘या’ बड्या नेत्याच्या वक्तव्याने खळबळ

Manoj Jarange Patil यांनी घेतली माघार; केलं ‘हे’ मोठं वक्तव्य