Maharashtra Rain Update | पुढील 5 दिवस असा असेल पाऊस, महाराष्ट्रातील ‘या’ भागांना इशारा

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

नाशिक | राज्यात गेले काही दिवस पावसाने (Heavy Rainfall) तुफान राडा घातला आहे. राज्याच्या अनेक ठिकाणी शेतातील पिकांना मोठा फटका बसला आहे. नाशिक येथे वादळीवाऱ्यासह गारपीटीचा पाऊस झाला. त्यामुळे येथील पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. दरम्यान, हवामान विभागाने एक महत्त्वाची माहिती दिली आहे.

हवामान विभागाने काय माहिती दिली?

ऐन हिवाळ्यात (Winter Season) नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात पावसाने राज्यभरात तुफान धिंगाणा घातला आहे. नाशिकमध्ये (Nashik) अवकाळी पावसामुळे येथील पिकांना याचा फटका बसला आहे. दरम्यान, हवामान विभागाने (Department of Meteorology) दिलेल्या माहितीनूसार पुढील पाच दिवस राज्यात बारीक सरींचा पाऊस बरसणार आहे.

महाराष्ट्रात (Maharashtra Rain Update) गारपिटीची शक्यता नसली तरीही 2 डिसेंबरपर्यंत ढगाळ वातावरण आणि काही ठिकाणी तुरळक पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे पुढील पाच दिवस पाऊस पडणार असल्याचं हवामान विभागाने म्हटलं आहे. या पावसाचा रब्बी पिकांना फायदा होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, हवामान विभागाने एक महत्त्वाचा इशारा देखील दिला आहे. 29 नोव्हेंबरपासून सुरु असलेला पाऊस 2 डिसेंबरपर्यंत महाराष्ट्राच्या काही भागात मुक्काम करणार आहे. त्यानंतर कडाक्याची थंडी सुरु होऊ शकते. राज्यात फक्त पाच दिवसच पाऊस का पडणार? या मागचं कारण देखील हवामान विभागाने सांगितलं आहे.

काय आहे नेमकं कारण?

बंगालच्या उपसागरात (Bay Of Bengal) तयार झालेलं चक्रीवादळ आणि वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे (Western Disturbance) राज्यासह देशाच्या हवामानात मोठा बदल झाला आहे. मात्र आता बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ विकसित होण्याची शक्यता असून ते बांगलादेशकडे मार्गस्थ होण्याच्या शक्यतेमुळे महाराष्ट्रावर त्याचा कोणताही परिणाम जाणवणार नाही, असं हवामान विभागाने सांगितलं आहे.

News Title: Maharashtra rain update, heavy rains are likely to occur in this part of the state for the next five days

थोडक्यात बातम्या-

Uttarkashi Tunnel Rescue | ‘ती’ एक गोष्ट ठरली वरदान; उत्तरकाशीतून मोठी अपडेट समोर

Pune Crime | माणुसकीला काळीमा फासणारं कृत्य; मुक्या जीवावर गोळीबार

“6 डिसेंबरनंतर देशात कधीही काहीही होऊ शकतं”; ‘या’ बड्या नेत्याच्या वक्तव्याने खळबळ

Manoj Jarange Patil यांनी घेतली माघार; केलं ‘हे’ मोठं वक्तव्य

Skin Care | चेहऱ्यावर Beer लावल्याने होतात ‘हे’ फायदे