मोठी बातमी! Antarwali Sarathi प्रकरणातील आरोपी पोलिसांच्या ताब्यात

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

जालना | मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी जालना येथे अंतरवाली सराटी (Antarwali Sarathi) गावात आंदोलन केलं होतं. कसला ही विचार न करता मनोज जरांगे पाटलांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी सरकारकडे मागणी करत आंदोलन करत होतं.

दरम्यान, अंतरवालीमध्ये आंदोलन सुरु असताना मोठा राडा झाला होता. आंदोलनावेळी अंतरवाली सराटी गावात मोठ्या प्रमाणात दगडफेक, जाळपोळ आणि लाठीचार्च झाला होता. यामध्ये अनेक मराठा बांधव जखमी झाली होते. मात्र हे कारस्थान घडवूनन आणणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अखेर ताब्यात घेतलं आहे.

कोण आहे मुख्य आरोपी?

अंतरवाली सराटी येथे सुरु असलेल्या आंदोलनावेळी दगडफेक, जाळपोळ आणि लाठीचार्ज झाला. हा लाठीचार्ज सरकारनेच घडवून आणला अशा चर्चा सुरु होत्या. मात्र हा लाठीचार्ज बीड जिल्ह्यातील गेवराई येथील ऋषिकेश बेदरे (Rishikesh Bedre) या पट्टयांनी केल्याचं माध्यमांच्या माहितीनूसार समोर आलं.

आंदोलन सुरु असताना ऋषिकेशने जाळपोळ करत घटनास्थळी गोंधळ केला होता. दरम्यान, या प्रकरणामागे मुख्य आरोपी कोण? याचा तपास पोलिस करत होते. त्यानंतर पोलिसांनी ऋषिकेशला जाळ्यात घेतलं. त्याला 2 डिसेंबरपर्यंत न्यायालीन कोठडी सुनावण्यात आली होती.

मात्र, त्याच्याकडे सापडलेल्या गावठी पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुस प्रकरणात आता पुन्हा त्याला अटक करण्यात आली आहे. तसेच, त्याला न्यायालयात हजर केलं असता, न्यायालयाने 2 डिसेंबरपर्यंत म्हणजेच 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. दगडफेक आणि जाळपोळ करणाऱ्या आरोपीच्या अटकेवर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील काय प्रतिक्रीया देणार? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

कोण आहे ऋषिकेश बेदरे?

ऋषिकेश बेदरे हा वाळू पट्ट्यात दहशत असून, त्याच्यावर बीड, जालना, आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात 14 गुन्हे दाखल आहेत. यात दरोडा, मारहाण, बेकायदा शस्त्र बाळगणं, जीवे मारण्याचा प्रयत्न करणं, रस्त्यात अडवून लूट करणं, दारू विक्री, जुगार, बदनामी करणं यासह इतर अनेक कलमान्वये गुन्हे दाखल आहेत.

News Title : Big news! Accused in Antarwali Sarati case finally in police custody

थोडक्यात बातम्या-

Maharashtra Rain Update | पुढील 5 दिवस असा असेल पाऊस, महाराष्ट्रातील ‘या’ भागांना इशारा

Tractor Sales | शेतकरी राजाची ट्रॅक्टरकडे पाठ, ट्रॅक्टरच्या विक्रीत झाली घट… नेमकी काय आहेत कारणं?

मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या संपत्तीचा आकडा समोर

Uttarkashi Tunnel Rescue | ‘ती’ एक गोष्ट ठरली वरदान; उत्तरकाशीतून मोठी अपडेट समोर

Pune Crime | माणुसकीला काळीमा फासणारं कृत्य; मुक्या जीवावर गोळीबार