Arnold Dix | ‘नायक हे असामान्य असतात’; 41 कामागारांसाठी अरनॉल्ड डिक्स ठरले देवदूत

Uttarkashi tunnel rescue | उत्तर काशीतील एका टनेलमध्ये अडकलेल्या 41 मजुरांपैकी तीन कामगार बाहेर आले आहेत. तब्बल 400 तासानंतर म्हणजे 17 दिवसानंतर तीन कामगार बाहेर आले. त्यानंतर एक एक करत 25 कामगारांना बाहेर काढण्यात आलं. त्यानंतर तासाभरातच सर्वच्या सर्व 41 कामगारांना बाहेर काढण्यात आलं आहे. या कामगारांना टनेलमधून बाहेर काढल्यानंतर थेट रुग्णालयात नेण्यात आलं आहे. त्याच्यावर तिथे उपचार करण्यात येत आहेत. या सर्व कामगारांना बाहेर काढण्यासाठी एनडीआरएफ आणि एसडीआरएफची टीम काम करत होती.

Arnold Dix was an angel for the workers 

सर्व कामगार आता मोकळा श्वास घेत आहेत. पण 17 दिवस चाललेल्या या बचाव मोहिमेचे यश अर्नोल्ड डिक्सशिवाय अपूर्ण होतं. अरनॉल्ड डिक्स हे नाव कुणाला माहित असेल कुणाला माहित ही नसेल मात्र बोगद्यात अडकलेल्या मजुरांना बाहेर काढण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे.

प्रोफेसर अर्नोल्ड डिक्स कोण आहेत? 

अरनॉल्ड डिक्स हे भूगर्भातील बोगद्यातील जगातील सर्वात प्रसिद्ध तज्ञांपैकी एक आहेत. डिक्सच्या लिंक्डइन प्रोफाइलनुसार, त्याने युनायटेड किंगडममधील हेलीबरी येथून शालेय शिक्षण पूर्ण केले. यानंतर डिक्सने ऑस्ट्रेलियातील मोनाश विद्यापीठातून लीगल प्रोफेशनल आणि कॉर्पोरेट लॉसह भू-तंत्रज्ञान आणि अभियांत्रिकी विज्ञान विषयात पदवी पूर्ण केली. आंतरराष्ट्रीय टनेलिंग असोसिएशनचे अध्यक्ष ऑस्ट्रेलियन अरनॉल्ड डिक्स यांनी या वयात आव्हानात्मक परिस्थितीत बचाव कार्याचे नेतृत्व करण्यासाठी 24/7 काम केलं. कामगारांना वाचवणारा खरा हिरो अरनॉल्ड डिक्स यांनी म्हटलं जात आहे. भारतीयांकडून त्यांचं सोशल मीडियातून कौतुक केलं जात आहे. सध्या एक पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. यात अरनॉल्ड डिक्स यांना लोकांनी खरा हिरो असल्याचं म्हटलंय.

नायक हे असामान्य असतात

अडकलेल्या कामगारांना आपलेच पुत्र असल्यासारखं त्यांनी वागवलं, त्यांच्याशी बोलत राहिले, त्यांना धीर दिला. स्थानिकांसोबत त्यांच्यासाठी प्रार्थना केली.
त्याचा देश नव्हता, त्याचे लोक नव्हते, त्याचे काम नव्हते. पण आंतरराष्ट्रीय टनेलिंग असोसिएशनचे अध्यक्ष ऑस्ट्रेलियन अरनॉल्ड डिक्स यांनी या वयात आव्हानात्मक परिस्थितीत बचाव कार्याचे नेतृत्व करण्यासाठी 24/7 काम केलं आहे. अडकलेल्या कामगारांना ते आपलेच पुत्र असल्यासारखं वागवलं, त्यांच्याशी बोलत राहिले, त्यांना धीर दिला. स्थानिकांसोबत त्यांच्यासाठी प्रार्थना केली. नायक हे असामान्य असतात, असं त्या पोस्टमध्ये म्हटलंय.

प्रोफेसर अर्नोल्ड डिक्स यांची कामगारांना बोगद्यातून बाहेर काढलेल्या तज्ञांमध्ये मोठी भूमिका बजावली. अरनॉल्ड 20 नोव्हेंबर रोजी या बचाव कार्याशी संबंधित होते. यानंतर त्याने सांगितलं की, भारताला मदत करताना मला चांगले वाटत आहे. डिक्स म्हणाला की त्याला बरे वाटत आहे. डिक्स म्हणाले होते की, पर्वतांनी आपल्याला नम्र राहण्याची एक गोष्ट शिकवली आहे. अरनॉल्ड डिक्स हा तोच व्यक्ती आहे ज्याने बोगद्यात अडकलेल्या 41 कामगारांची सुटका केली जाईल असा दावा केला होता.

महत्त्वाच्या बातम्या- 

ब्राझिलियन फळाची लागवड, महाराष्ट्रातील शेतकऱ्याने कमावले 4 लाख रुपये

मोठी बातमी! Antarwali Sarathi प्रकरणातील आरोपी पोलिसांच्या ताब्यात

मामा असावा तर असा….; भाचीच्या लग्नात ‘इतके’ कोटी कॅश घेऊन पोहोचला, लोक पाहतच राहिले

Maharashtra Rain Update | पुढील 5 दिवस असा असेल पाऊस, महाराष्ट्रातील ‘या’ भागांना इशारा

Tractor Sales | शेतकरी राजाची ट्रॅक्टरकडे पाठ, ट्रॅक्टरच्या विक्रीत झाली घट… नेमकी काय आहेत कारणं?