Maharashtra Weather Alert | हवामान विभागाकडून ‘या’ भागांना अलर्ट जारी

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

पुणे | ऐन हिवाळ्यात (Winter Season) महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे. मुंबई, पुण्यासह अनेक राज्यात पावसाची चांगलीच बॅटिंग पाहायला मिळत आहे. अवकाळी पावसामुळे राज्यातील काही भागात शेतीचं मोठं नुकसान झालं आहे.

गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे शेतकरी मित्र संकटात आल्याचं दिसत आहे. काही ठिकाणी वादळीवाऱ्यासह गारपीटीचा पाऊस झाला आहे. याच पार्श्वभूमीवर हवामान विभागाने आणखी एक महत्त्वाची (Maharashtra Weather Alert) माहिती दिली आहे.

हवामान विभागाने कोणती माहिती दिली?

नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात सुद्धा काही भागात जोरदार (Heavy Rainfall) पाऊस पडत आहे. तर काही ठिकाणी बारीक सरी पडत आहेत. दरम्यान, राज्याच्या काही भागात येलो (Yellow Alert) आणि ऑरेंज अर्लट (Orange Alert) देण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात विजांसह पावसाची शक्यता आहे. तर नाशिक, नगर, पुणे, छत्रपती संभाजीनगरसह बीड जिल्ह्याला हवामान खात्याकडून यलो अलर्ट देण्यात आला आहे. राज्यातील काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला आहे.

हिवाळ्यात सुरु असलेल्या पावसामुळे नागरिकांना घराबाहेर पडताना छत्री घेऊन जावं लागणार का? असा प्रश्न पडत आहे. मात्र, हवामान विभागाने (Meteorological Department) पावसाचा राज्यात कधीपर्यंत मुक्काम आहे यासंदर्भात देखील माहिती दिली आहे.

राज्यात आणखी किती दिवस पाऊस पडणार?

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनूसार मराठवाड्यात पुढील दोन ते तीन दिवस अवकाळी पाऊस राहणार आहे. सोबतच हवामान विभागाने, मराठवाड्याला यलो अलर्ट जारी केला आहे. जायकवाडी धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. जायकवाडी धरणाची पाणी पातळी पोहोचली 40 टक्क्यांच्या पुढे गेली आहे.

जायकवाडीत संभाजीनगर आणि जालन्याला तीन महिने पुरेल इतके पाणी पोहोचले आहे. जायकवाडीत पाणी 26 हजार क्यूसेकने पाणी येत आहे. अवकाळी पावसामुळे देखील जायकवाडी धरणाच्या पाणी पातळीत होतेय वाढ. जळगावात 22 वर्षात प्रथमच गारठा निर्माण झाला आहे. नोव्हेंबरमध्ये दिवसाचं तापमान 22 अंशावर आलं आहे.

राज्यात अवकाळी पाऊसामुळे शेतकऱ्यांंचं नुकसान

अकोल्यामध्ये अवकाळी पावसामुळे तूर, हरभरा, गहू, कपाशी आणि भाजीपाला इत्यादी पिकाचे मोठया प्रमाणात नुकसान झालं आहे. यामुळे उत्पादनात कमालीची घट येण्याची शक्यता असल्याचं चित्र सध्या निर्माण झालं आहे. शेतकऱ्याच्या हाता-तोंडाशी आलेला घास मात्र या अवकाळी पावसाने हिरावून घेतला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा शेतकरी संकटात सापडल्याचं चित्र राज्यात आहे. दरम्यान अवकाळी पावसानं बळीराजाला आर्थिक संकटात पाडलं आहे.

News Title : Maharashtra Weather Alert | Yellow and Orange alerts issued by Meteorological Department in ‘this’ area

थोडक्यात बातम्या-

शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी! ‘या’ शेतीसाठी मिळतंय एकरी 4 लाखांचं अनुदान

Nashik Heavy Rainfall | शेतात पाऊल ठेवताच बळीराजा ढसाढसा रडला, समोर बघितलं तर दिसलं…

Video | शाळकरी पोरांचे अश्लील चाळे, दोन मुलींना Kiss करताना दिसला, पाहा व्हिडीओ

LIC Pension Scheme | …तर निवृत्तीनंतर दर महिन्याला 28,000 पेन्शन मिळेल, LIC ची भन्नाट योजना

Nita Ambani | नीता अंबानींकडे आहे जगातील सर्वात महागडा फोन; किंमत वाचून थक्क व्हाल