ठाकरे गट मोठ्या अडचणीत; ‘ती’ एक चूक पडू शकते महागात

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

मुंबई | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांच्यावर टीका करणं, ठाकरे गटाला महागात पडण्याची शक्यता आहे. ठाकरे गटाच्या नेत्याच्या विरोधात थेट गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Will Uddhav Thackeray be arrested? 

ठाकरे गटाचे माजी विभागप्रमुख दत्ता दळवी यांनी शिंदेंवर टीका केल्या प्रकरणी भांडुप पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवसेना ठाकरे गटातर्फे रविवारी भांडुपमध्ये ईशान्य मुंबईत राहणाऱ्या कोकणवासियांचा जाहीर मेळावा आयोजित करण्यात आला होता. तिथे त्यांनी ही टीका केली.

दत्ता दळवींवर गुन्हा दाखल

सार्वजनिक सभेत संविधानिक पदावर बसलेल्या व्यक्तीबद्दल अश्लील शिवीगाळ आणि अपमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणी शिवसेना शिंदे गटाकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी हा दुसरा गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी भांडुप पोलिस अधिक तपास करत आहेत.

शिवसेना शिंदे गटाचे उपविभागप्रमुख भूषण पालांडे यांनी भांडुप पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. पालांडे यांच्या त्या तक्रारीनुसार भांडुप पोलिसांनी माजी महापौर दत्ता दळवी यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

उद्धव ठाकरेंना अटक होणार?

उद्धव ठाकरेमुख्यमंत्री असताना त्यांनी नारायण राणेंवर (Narayan Rane Jail Case) जी कारवाई केली तीच कारवाई आता उद्धव ठाकरे यांच्यावर करणार असल्याचे संकेत राज्याचे गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी दिले आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे तेलंगणामध्ये गेल्यानंतर त्यांच्यावर उद्धव ठाकरे यांनी टीका केली होती. त्याची सीडी आता मागवण्यात आली असून त्यावर कायदेशीर मतही घेतलं जाणार असल्याचंही शंभुराज देसाई म्हणाले. त्यामुळे नारायण राणे यांच्याप्रमाणे शिंदे सरकार आता उद्धव ठाकरे यांना जेलमध्ये टाकणार का याची उत्सुकता आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

Maharashtra Weather Alert | हवामान विभागाकडून ‘या’ भागांना अलर्ट जारी

Animal Movie | रणबीर कपूरच्या ‘Animal’ चित्रपटाला रिलीजपूर्वीच मोठा झटका!

शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी! ‘या’ शेतीसाठी मिळतंय एकरी 4 लाखांचं अनुदान

Nashik Heavy Rainfall | शेतात पाऊल ठेवताच बळीराजा ढसाढसा रडला, समोर बघितलं तर दिसलं…

Video | शाळकरी पोरांचे अश्लील चाळे, दोन मुलींना Kiss करताना दिसला, पाहा व्हिडीओ