1 डिसेंबरपासून ‘हे’ नियम बदलणार; तुमच्या खिशावर होणार परिणाम

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

नवी दिल्ली | 2023 वर्षाचा शेवटचा महिना म्हणजे डिसेंबर सुरु होणार असून वर्ष संपण्यापूर्वी तुमच्या पैशांशी संबंधित नियमांमध्ये अनेक बदल होणार आहेत. देशभरातील लोकांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम करणारे अनेक बदल अंमलात येतील.

सिमकार्ड खरेदीचे नवीन नियम लागू होणार

केंद्र सरकारने सिमकार्ड खरेदी-विक्रीचे नियम बदलले असून हे नवीन नियम 1 डिसेंबर 2023 पासून संपूर्ण देशात लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या नवीन नियमांच्या अंमलबजावणीनंतर एका आयडीवर मर्यादित सिम खरेदी करता येणार आहेत.

एलपीजी किंमत ठरणार

एलपीजी सिलिंडर, सीएनजी आणि पीएनजीच्या किमती प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेला ठरतात. दर महिन्याच्या पहिल्या दिवशी नवीन किमती जाहीर केल्या जातात. या काळात मागणी वाढल्याने लग्नाच्या मोसमात व्यावसायिक सिलिंडरच्या किमती वाढण्याची शक्यता आहे.

घरगुती वापराच्या सिलिंडरच्या दरात इंधन कंपन्यांकडून दिलासा मिळणार का, याकडे सामान्यांचे लक्ष लागले आहे. तसेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया द्वारे 1 डिसेंबर 2023 पासून कर्जासंबंधित नियमांमध्ये बदल करणार आहे.

HDFC बँकेने आपल्या Regalia क्रेडिट कार्डचे काही नियम बदलले आहेत. हे नियम कार्डच्या लाउंज वापराबाबत आहेत. 1 डिसेंबरपासून लाउंजमध्ये प्रवेश मिळविण्यासाठी काही अटी पूर्ण करणे आवश्यक आहे. आता रेगेलिया क्रेडिट कार्डधारक केवळ खर्चाच्या आधारावर लाउंजमध्ये प्रवेश करू शकणार आहे. लाउंज प्रवेशाचा लाभ घेण्यासाठी, क्रेडिट कार्ड युजर्सना एका कॅलेंडर तिमाहीत रुपये 1 लाख किंवा त्याहून अधिक खर्च करावे लागतील. म्हणजेच, कोणत्याही तिमाहीत 1 लाख रुपयांचे व्यवहार केल्यानंतरच तुम्ही लाउंज वापरण्यास सक्षम असाल.

टेक दिग्गज गूगलने त्यांच्या सर्व उत्पादन आणि सेवांसाठी गूगल खात्यासाठी निष्क्रियता कालावधी दोन वर्षांपर्यंत अद्यतनित करत असल्याची घोषणा केली आहे. कंपनीने आपल्या सर्व वापरकर्त्यांना ईमेलद्वारे या बदलाची माहिती दिली असून हा बदल 1 डिसेंबरपासून लागू केला जाईल.

The rules will change from December 1

महत्त्वाच्या बातम्या- 

Team India साठी सर्वात मोठी बातमी!

Randeep Hooda | रणदीप हुडा अडकला लग्नबंधनात, पाहा व्हिडीओ

ठाकरे गट मोठ्या अडचणीत; ‘ती’ एक चूक पडू शकते महागात

Maharashtra Weather Alert | हवामान विभागाकडून ‘या’ भागांना अलर्ट जारी

Animal Movie | रणबीर कपूरच्या ‘Animal’ चित्रपटाला रिलीजपूर्वीच मोठा झटका!