LICनं आणली आपली नवी भन्नाट योजना, कमीत कमी गुंतवणुकीत आयुष्यभर मिळणार परतावा!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Jeevan Utsav Policy | आयुष्यात पैसे कमवायला लागल्यानंतर सगळ्यात आधी गुंतवणुकीचा सल्ला दिला जातो. अचानक आपल्यावर एखादं संकट आल्यास ही गुंतवणूक (investment) आपल्याला उपयोगाची पडते. अचानक घरातील व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्या कुटुंबाची जबाबदारी झेलणं अवघड असतं.

जीवन उस्तव योजना

अशावेळी LIC पाॅलिसी करण्याचा सल्ला दिला जातो. एलआयसी पाॅलिसीमध्ये अनेक योजना आणि कमी व्याजदर उपलब्ध आहेत. अशात आता LIC ने नवीन योजना आणली आहे. ही पॉलिसी उत्तम परतावा देईल. ‘जीवन उस्तव योजना’ असं या योजनेचं नाव आहे.

कोण पात्र आहे?

LIC च्या या नवीन योजनेसाठी, किमान वय 18 वर्षे आणि कमाल 75 वर्षे आहे. यासाठी किमान पाच वर्षे प्रीमियम भरावा लागेल. कमाल प्रीमियम पेमेंट कालावधी 16 वर्षे आहे.

एलआयसीचे अध्यक्ष सिद्धार्थ मोहंती यांनी सांगितलं होतं की नवीन पॉलिसी खात्रीशीर परतावा देईल आणि ती पूर्ण झाल्यानंतर, पॉलिसीधारकाला आयुष्यभर विमा रकमेच्या 10 टक्के रक्कम मिळेल. नवीन विमा पॉलिसी ‘जीवन उत्सव’मध्ये कर्जाची सुविधा आणि मुदतपूर्व पैसे काढण्याची सुविधाही उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले. पॉलिसीची किमान मूळ विमा रक्कम 5 लाख रुपये असेल. कमाल मूळ विम्याच्या रकमेवर कोणतीही मर्यादा नाही. या पॉलिसीमध्ये प्रीमियम भरण्याची मुदत आजीवन परताव्यासह 5 ते 16 वर्षांपर्यंत मर्यादित आहे. या पॉलिसीमध्ये लाईफ रिटनची सुविधा देण्यात आली आहे.

LICच च्या शेअर्समध्ये वाढ 

देशातील सर्वात मोठी सरकारी विमा कंपनी LIC चा शेअर पुन्हा वाढण्याची दीर्घकाळ वाट पाहणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. ब्रोकरेज फर्म जिओजितने दीर्घकालीन दृष्टीकोनातून एलआयसीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. ब्रोकरेजचे म्हणणं आहे की नवीन उत्पादन लॉन्च केल्याने कंपनीच्या वाढीला गती मिळेल. एलआयसी ही विमा आणि गुंतवणूक कंपनी आहे. गेल्या एका महिन्यापासून शेअरमध्ये चांगली रिकव्हरी झाली असून शेअरमध्ये सुमारे 14 टक्क्यांनी उसळी घेतली आहे. ब्रोकरेजचा असा विश्वास आहे की पुढील 12 महिन्यांत LIC सध्याच्या पातळीपासून सुमारे 21-22 टक्क्यांनी वाढेल.

एलआयसीने बुधवारी आपली योजना जीवन उत्सव सुरू केली. यामध्ये हमी परताव्याचे आश्वासन देण्यात आलं आहे. ब्रोकरेज हाऊसचं म्हणणं आहे की लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन (LIC) चे नवीन उत्पादन लॉन्च केल्याने कंपनीच्या वाढीला चालना मिळेल. एलआयसीमध्ये सरकारची मॅच्युरिटी स्टेक आहे. ही देशातील आघाडीची विमा आणि गुंतवणूक कंपनी आहे. कंपनीची मालमत्ता अंतर्गत व्यवस्थापन (AUM) 47 लाख कोटी रुपये आहे आणि तिने सुमारे 270 सूचीबद्ध कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

Maharashtra Rain Update | अवकाळी पाऊस कधीपर्यंत राहणार?, पंजाब डख यांचा अत्यंत महत्त्वाचा अंदाज

Tata Technology च्या शेअरची बाजारात धमाकेदार एंट्री; गुंतवणूकदार झाले मालामाल

Exit poll 2023 | …म्हणून एक्झिट पोल महत्त्वाचे असतात; जाणून घ्या ‘या’ गोष्टी

Maharashtra Weather Update | हवामान विभागाकडून मोठी अपडेट, ‘या’ भागांना गारपीटीचा इशारा

1 डिसेंबरपासून ‘हे’ नियम बदलणार; तुमच्या खिशावर होणार परिणाम