Maharashtra Rain Update | अवकाळी पाऊस कधीपर्यंत राहणार?, पंजाब डख यांचा अत्यंत महत्त्वाचा अंदाज

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

मुंबई | ऐन थंडीत अवकाळी पावसाने (Maharashtra Rain) थैमान घातलं आहे. राज्यातील अनेक भागांमध्ये अवकाळी पावसामुळे मोठं नुकसान झालं आहे. अनेक जिल्ह्यामध्ये गारपीटीसह पावसाने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान केलंय. अशात आता हा पाऊस कधी थांबणार? असा प्रश्न सर्वांना पडलाय. अशात राज्यातील हावामानाबाबत जेष्ठ हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी अत्यंत महत्त्वाची माहिती दिली आहे.

पंजाबराव डख यांनी सांगितलं पाऊस कधी थांबणार

पंजाबरावांनी राज्यात दोन डिसेंबर पर्यंत कसे हवामान राहणार याबाबत माहिती दिली आहे.  राज्यात अजूनही अवकाळी पावसाचे वातावरण पूर्णपणे गेलेले नाही. राज्यात आणखी काही दिवस पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यांनी सांगितले की, राज्यात आता 2 डिसेंबर पर्यंत अवकाळी पाऊस सुरू राहणार आहे.

भविष्यात अवकाळी पावसाला सामोरं जावं लागणार

पृथ्वीचं वाढतं तापमान हे अवकाळी पावसाला कारणीभूत असल्याचं पंजाबराव डख यांनी सांगितलं आहे. भविष्यात अवकाळी पावसाला, गारपीटीला सामोरं जावं लागणार आहे. हवेचं कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झाल्यामुळं अशी स्थिती निर्माण होत आहे, असंही ते म्हणालेत.

पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रात हा पाऊस 1 डिसेंबरपर्यंत राहणार आहे. पण उत्तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी काळजी करण्याचं कारण नाही. मागील दोन दिवसात खूप गारपीट झाली आहे. पण आता गारपीट पडणार नसल्याचं डख यांनी म्हटलं आहे.

कुठे कुठे पाऊस पडणार?

राज्यातील कोल्हापूर, सोलापूर, सांगली, बार्शी, उस्मानाबाद, लातूर, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, छत्रपती संभाजी नगर, अहमदनगर, अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर या भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे. 1 डिसेंबरपर्यंत तर काही ठिकाणी 2 डिंसेंबरपर्यंत अवकाळी पाऊस पडणार असा अंदाज आहे. यात राज्यातील पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भसहित विविध भागांमध्ये अवकाळी पाऊस हजेरी लावणार असल्याचा अंदाज आहे.

Punjabrao Dakh said when will the rain stop

महत्त्वाच्या बातम्या- 

Tata Technology च्या शेअरची बाजारात धमाकेदार एंट्री; गुंतवणूकदार झाले मालामाल

Exit poll 2023 | …म्हणून एक्झिट पोल महत्त्वाचे असतात; जाणून घ्या ‘या’ गोष्टी

Maharashtra Weather Update | हवामान विभागाकडून मोठी अपडेट, ‘या’ भागांना गारपीटीचा इशारा

1 डिसेंबरपासून ‘हे’ नियम बदलणार; तुमच्या खिशावर होणार परिणाम

Team India साठी सर्वात मोठी बातमी!