Weather Update | पुण्यासह ‘या’ 10 जिल्ह्यांना हवामान विभागाचा सर्वात मोठा इशारा!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

मुंबई | नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात सुद्धा काही राज्यात पावसाचा जोर कायम आहे. संपूर्ण राज्यभरात पावसाने थैमान घातल्याचं पहायला मिळत आहे. तर काही भागात गारपीटीसह अवकाळी पाऊस (Weather Update) झाला आहे. मात्र, हवामान विभागाने पुण्यासह काही राज्यांना सर्तकतेचा इशारा देत अत्यंत महत्त्वाची माहिती दिली आहे.

हवामान विभागाने कोणती महत्त्वाची माहिती दिली?

गेले काही दिवस राज्यात पावसाने मुक्काम केल्याचं पहायला मिळत आहे. अवकाळी पावसामुळे (Heavy Rainfall) शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. मात्र, हवामान विभागाकडून (Department Of Meterology) मिळालेल्या माहितीनुसार. पुढील 48 तासात मध्य महाराष्ट्र मराठवाडा व विदर्भात तुरळ ठिकाणी मेघगर्जनेसह वीजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे.

विशेषतः नाशिक, अहमदनगर, पुणे (Pune), छत्रपती संभागजीनगर, बीड, अकोला, अमरावती, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ व जळगाव जिल्हा प्रभावित राहतील. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याला 30 तारखेला गारपीट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तर, पुढील तीन दिवस राज्याच्या काही भागात तुरळक ठिकाणी अति हलका ते हकल्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

पावसाचं कारण हवामान विभागाने सांगितलं

राज्यात सुरु असलेल्या पावसामुळे काही ठिकाणी शेतीचं नुकसान झालं आहे. तूर, हरभरा, गहू, कपाशी आणि भाजीपाला इत्यादी पिकाचे मोठया प्रमाणात नुकसान झालं आहे. दरम्यान, हवामान विभागाने दिेलेल्या माहितीनूसार आग्नेय बंगालचा उपसागर आणि लगतच्या दक्षिण अंदमान समुद्रावर कमी दाबाचे क्षेत्र तीव्र झालं आहे.

त्यामुळे 30 नोव्हेंबरपर्यंत दक्षिण पूर्व आणि बंगालच्या उपसागरामध्ये हळूहळू ते कमी दाबाच्या पट्ट्यात रूपांतर होऊन पश्चिम वायव दिशेने सारखेच राखण्याची शक्यता आहे. तर 2 डिसेंबरपर्यंत नैऋत्य आणि लगतच्या आग्नेय बंगालच्या उपसागरात मिचांग चक्रीवादळ निर्माण होईल आणि यामुळे अनेक राज्यांमध्ये मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

पंजाबरावांनी राज्यात दोन डिसेंबर पर्यंत कसं हवामान राहणार याबाबत माहिती दिली आहे.  राज्यात अजूनही अवकाळी पावसाचं वातावरण पूर्णपणे गेलेलं नाही. राज्यात आणखी काही दिवस पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यांनी सांगितलं की, राज्यात आता 2 डिसेंबरपर्यंत अवकाळी पाऊस सुरू राहणार आहे.

News Title : Weather Update | Meteorological department’s biggest warning to ‘these’ 10 districts including Pune!

थोडक्यात बातम्या-

Exit poll 2023 | काँग्रेसची झोप उडवणारी बातमी समोर!

Kolhapur News | कोल्हापुरातील ‘या’ भागात ढगफुटीसदृश्य पाऊस, रहिवाशांची तारांबळ

LICनं आणली आपली नवी भन्नाट योजना, कमीत कमी गुंतवणुकीत आयुष्यभर मिळणार परतावा!

Maharashtra Rain Update | अवकाळी पाऊस कधीपर्यंत राहणार?, पंजाब डख यांचा अत्यंत महत्त्वाचा अंदाज

Tata Technology च्या शेअरची बाजारात धमाकेदार एंट्री; गुंतवणूकदार झाले मालामाल