Winter session | ‘जय हिंद’,’वंदे मातरम्’, थँक्स सारख्या घोषणांना मज्जाव!, खासदारांसाठी नियमावली जारी

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Winter session | राज्यसभेच्या अध्यक्षांनी राज्यसभेच्या (Rajya Sabha) सभागृहातील सदस्यांसाठी अनेक मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. संसदेचे हिवाळी अधिवेशन 4 डिसेंबरपासून सुरू होत आहे. त्याआधी राज्यसभा सदस्यांसाठी जारी केलेली मार्गदर्शक तत्त्वे महत्त्वाची मानली जात आहेत. आता राज्यसभा खासदारांना सभागृहात जय हिंद, वंदे मातरम, धन्यवाद, धन्यवाद अशा घोषणा टाळाव्या लागणार असल्याची माहिती समोर आली आहे.

नव्या नियमांची यादी जाहीर-

राज्यसभा कार्यालयाने नियमांची यादी जारी केली आहे. यामध्ये एकाच वेळी दोन सदस्यांना जागेवरून उठून प्रश्न विचारता येणार नाही. राज्यसभेत उपस्थित केले जाणारे प्रश्न सार्वजनिक केले जाणार नाहीत. तसेच, राज्यसभेच्या सभागृहात कोणत्याही प्रकारचे फलक झळकवण्यास  (Winter session) आता बंदी घालण्यात आली आहे.

संसद सदस्यांना त्यांच्या वैयक्तिक परदेश दौऱ्यांमध्ये परदेशी पाहुणचार स्वीकारताना मार्गदर्शक तत्त्वांचं पालन करण्यास सांगितलं गेलं आहे. खासदारांनी अशा भेटवस्तू स्वीकारू नयेत ज्यामुळे त्यांना त्यांची अधिकृत कर्तव्ये प्रामाणिकपणे आणि निःपक्षपातीपणे पार पाडण्यास अडथळा येईल.

सुविधेचा गैरवापर करू नये-

दुसर्‍या अधिसूचनेत म्हटलं आहे की खासदारांनी (Member of Parliament) संसदेची बदनामी होईल आणि तिची विश्वासार्हता खराब होईल असं काहीही करणं टाळावं. खासदार म्हणून उपलब्ध असलेल्या कोणत्याही सुविधेचा गैरवापर करू नये, असं सदस्यांना सांगण्यात आलं आहे. कोणत्याही धर्माचा अनादर करू नका. धर्मनिरपेक्ष मूल्यांचा प्रचार करा. संसद सदस्यांनी सार्वजनिक जीवनात नैतिकता, प्रतिष्ठा, शालीनता आणि मूल्ये यांचे उच्च दर्जाचं पालन करणं अपेक्षित आहे.

लिखित भाषण वाचता येणार नाही-

राज्यसभेचे सभापती बोलत असताना सभागृहातील कोणत्याही सदस्याला सभागृह सोडून जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. राज्यसभा सदस्यांना लिखित भाषण वाचता येणार नाही. राज्यसभेतील कार्यवाही सुरू असताना व्हिडिओग्राफी करायला बंदी करण्यात आली आहे. यासोबतच संपूर्ण संसद परिसरामध्ये धूम्रपान करण्यास बंदी घालण्यात आली आहे.

Winter session: New Regulations issued for MPs

महत्त्वाच्या बातम्या- 

तुमचं करोडपती होण्याचं स्वप्न होईल पूर्ण!, हा फॅार्म्युला एकदा वाचाच…

60 टक्के लोक Mumbai सोडण्याच्या विचारात, कारण आहे फारच धक्कादायक

Weather Update | पुण्यासह ‘या’ 10 जिल्ह्यांना हवामान विभागाचा सर्वात मोठा इशारा!

Exit poll 2023 | काँग्रेसची झोप उडवणारी बातमी समोर!

Kolhapur News | कोल्हापुरातील ‘या’ भागात ढगफुटीसदृश्य पाऊस, रहिवाशांची तारांबळ