Weather update | 24 तासात ‘या’ भागात अतिवृष्टीचा अंदाज, तर काही भागात बर्फवृष्टीचाही इशारा!

मुंबई (weather update) | महाराष्ट्रात गेले काही दिवस अवकाळी पाऊस सुरु आहे. मराठवाड्यासह अन्य भागात पावसाच्या सरीवर सरी वाढत चालल्या आहेत. मागील आठवड्यापासून हवमान विभाग पावासाचा इशारा देत आहे. यंदा होत असलेल्या अवकाळी पावसामुळे राज्यातील काही भागात रब्बी पिकांना मोठा फटका बसला आहे.

दरम्यान, हवामान विभागाने (Department of Meteorology) मराठवाड्यासह राज्याच्या काही भागांना सर्तकतेचा इशारा दिला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हवामान विभागाने पुढील 24 तासात काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा दिला आहे.

राज्याच्या कोणत्या भागात अतिवृष्टीचा इशारा?

हवामान विभागाने वर्तवलेल्या माहितीनुसार, विदर्भ आणि मराठवाड्यात तसेच उत्तर महाराष्ट्रामध्ये मेघगर्जनेसह पाऊस हजेरी लावू शकतो. तर याच भागात पावसाचा यलो अलर्ट (weather update) देखील जारी करण्यात आला आहे. काही दिवसांपासून अरबी समुद्रासह बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे आणि वाऱ्यांची चक्राकार स्थिती निर्माण झाल्यामुळं राज्याच्या बहुतांश भागांना अवकाळी पावसाचा तडाखा बसल्याचं पाहायला मिळत आहे.

दुसरीकडे, केरळच्या उत्तर भागापासून मध्य महाराष्ट्रापर्यंत सक्रिय असणारा कमी दाबाचा पट्टा विरून गेला आहे, ज्यामुळं राज्याच्या काही भागांमध्ये पावसाचा जोर ओसरला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातून पाऊस लवकरच निरोप घेणार असल्याचा अंदाज देखील वर्तवण्यात येत आहे.

देशातील काही भागांमध्ये बर्फवृष्टीचा इशारा-

देशातील हवामानाबाबत हवामान विभागाकडून महत्त्वाची माहिती देण्यात आली आहे. अंदमान आणि निकोबार बेटांवर तसेच तमिळनाडूमध्ये मध्यम स्वरुपाच्या पावसाच्या सरी बरसतील. तर काही भागात पुढील 24 तासात जोरदार पावसाची शक्यता देखील हवामान विभागाने वर्तवली आहे. दरम्यान, जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश, लडाख, मुजफ्फराबाद आणि गिलगिट बाल्टिस्तान या भागाच्या मैदानी क्षेत्रांमध्ये मध्यम स्वरुपातील पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे, तसेच या भागातील पर्वतीय क्षेत्रांमध्ये हिमवृष्टीची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे.

weather update: राज्यात कधीपर्यंत पाऊस पडणार?

राज्यात अवकाळी पाऊस पडल्याने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे, अजूनही राज्याच्या काही भागांमध्ये पावसाच्या सरी सुरु असून हा पाऊस थांबणार तरी कधी असा सवाल शेतकऱ्यांना पडला आहे. तर याबाबत एक महत्त्वाची माहिती हाती आली आहे.

सध्या ईशान्य अरबी समुद्रामध्ये चक्रीय वाऱ्यांची स्थिती निर्माण झाली असून, बंगालच्या खाडी भागामध्ये कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. या संपूर्ण परिस्थितीच्या एकत्रिकरणामुळं 30 तारखेपासून वाऱ्यांच्या स्थितीत बदल होणार आहे. या स्थितीचं रुपांतर 2 डिसेंबरच्या सुमारास चक्रीवादळामध्ये होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अरबी समुद्राच्या ईशान्येकडे सध्या अंशत: सक्रिय वाऱ्यांची स्थिती सक्रिय असून, परिणामस्वरुप काही भागांमध्ये पावसाची हजेरी पाहायला मिळू शकते. कोकण पट्टा मात्र इथं अपवाद ठरेल. यामुळे 2 तारखेनंतर पाऊस कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

 

थोडक्यात बातम्या-

तुमचं करोडपती होण्याचं स्वप्न होईल पूर्ण!, हा फॅार्म्युला एकदा वाचाच…

60 टक्के लोक Mumbai सोडण्याच्या विचारात, कारण आहे फारच धक्कादायक

Weather Update | पुण्यासह ‘या’ 10 जिल्ह्यांना हवामान विभागाचा सर्वात मोठा इशारा!

Exit poll 2023 | काँग्रेसची झोप उडवणारी बातमी समोर!

Kolhapur News | कोल्हापुरातील ‘या’ भागात ढगफुटीसदृश्य पाऊस, रहिवाशांची तारांबळ