अजित पवार यांची सर्वात मोठी घोषणा, “लोकसभेच्या ‘या’ 4 जागा लढवणार!”- Ajit Pawar

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

रायगड | राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवार (Ajit Pawar) यांनी बंड केल्यानंतर दोन गट तयार झाले आहेत. दोन्ही गटांनी आपणच खरी राष्ट्रवादी असल्याचा दावा केला आहे. खरी राष्ट्रवादी नेमकी कुणाची यावर निवडणूक आयोगात सध्या फैसला चालू आहे, मात्र तत्पूर्वी लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election) आधी भाजपला जाऊन मिळालेल्या अजित पवार यांनी मोठी घोषणा केली आहे.

लोकसभेच्या जागांवर अजित पवारांचा दावा-

2024 मध्ये लोकसभेच्या निवडणुका होणार आहे. या निवडणुकीमध्ये सर्वाधिक जागा जिंकून आणण्याचा भाजपचा मानस आहे. त्या पार्श्वभूमीवर जास्तीत जास्त पक्षांना NDA मध्ये सामावून घेण्याची भाजपची योजना आहे. अजित पवार (Ajit Pawar) यांची राष्ट्रवादीसुद्धा भाजपसोबत सत्तेत सामील झाली आहे, मात्र लोकसभेला जागावाटप कसं होणार याचा प्रश्न सर्वांना पडला असताना अजित पवारांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. त्यांनी महाराष्ट्रातील काही लोकसभेच्या जागांवर थेट दावा केला आहे. 

महायुतीत लोकसभेच्या चार जागा अजित पवार गट लढवणार असल्याची घोषणा स्वतः अजित पवारांनी केली आहे. बारामती, शिरूर, सातारा, रायगड या जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस निवडणूक लढवणारच आहे, असं त्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे सध्या राष्ट्रवादीकडे लोकसभेच्या एकूण 4 जागा आहेत.

ajit pawar 1 jpg

नेमकं काय म्हणाले अजित पवार?

मार्चच्या पहिल्या आठवड्यात लोकसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता लागण्याचा अंदाज आहे. यावेळी पुन्हा एकदा NDAचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनाच निवडून आणण्याचा आपल्याला प्रयत्न करायचा आहे. महाराष्ट्रातून 48 खासदार निवडून आणायचे आहेत. बारामती, शिरूर, सातारा, रायगड या जागा आपण निवडणार आहोत, असं अजित पवार म्हणाले.

वरील चार जांगाशिवाय इतर जागांसंदर्भात आपण शिंदे, फडणवीसांशी चर्चा करून लवकरच निर्णय जाहीर करु. जागावाटपासंदर्भात या सर्वांशी प्राथमिक चर्चा झाली आहे. आपल्या कार्यकर्त्याची ताकद पाहून आपण आणखी जागांची निवड करणार आहोत, असंही ते म्हणाले.

Satara, Shirur, Baramati and Raigad Loksabha constituency-

दरम्यान, अजित पवार (Ajit Pawar) यांनी दावा केलेल्या चार ठिकाणांपैकी बारामतीमध्ये सुप्रिया सुळे, शिरुरमध्ये अमोल कोल्हे तर साताऱ्यातून श्रीनिवास पाटील खासदार आहेत, हे तिघेही सध्या राष्ट्रवादीच्या शरद पवार गटासोबत आहेत. तर रायगडमध्ये सुनील तटकरे खासदार आहेत, ते अजित पवार गटासोबत आहेत. अजित पवार यांच्या दाव्यामुळे आता बारामती, शिरुर आणि साताऱ्यात शरद पवार यांना थेट आपल्याच पक्षाकडून आव्हान निर्माण झालं आहे.

News Title: Ajit Pawar important announcement for Loksabha Election

महत्त्वाच्या बातम्या-

SBI मध्ये खातं असणाऱ्यांसाठी मोठी बातमी!

Weather update | 24 तासात ‘या’ भागात अतिवृष्टीचा अंदाज, तर काही भागात बर्फवृष्टीचाही इशारा!

Winter session | ‘जय हिंद’,’वंदे मातरम्’, थँक्स सारख्या घोषणांना मज्जाव!, खासदारांसाठी नियमावली जारी

बना Millionaire | तुमचं करोडपती होण्याचं स्वप्न होईल पूर्ण!, हा फॅार्म्युला एकदा वाचाच…

60 टक्के लोक Mumbai सोडण्याच्या विचारात, कारण आहे फारच धक्कादायक