Government Strike | ‘या’ कारणामुळे राज्यातील 17 लाख कर्मचारी संपावर!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Government Strike | यंदाच्या वर्षी अनेक कर्मचाऱ्यांनी संप पुकारला होता. काही महिन्यांपूर्वी राज्यातील अनेक एसटी कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्यांसाठी संप पुकारला होता, अशा बऱ्याच कर्मचाऱ्यांनी संपाची हाक देत प्रशासनाला खडबडून जागं केलं होतं. मात्र, वर्षाच्या शेवटच्या महिन्यात सुद्धा कर्मचाऱ्यांनी संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे.

नेमकं काय आहे प्रकरण?-

बेमुदत संपाच्या माध्यमातून संपावर जाणाऱ्या कर्मचाऱ्यांनी बऱ्याच मागण्या उचलून धरल्या आहेत. यामध्ये तब्बल 17 लाख राज्य सरकारी कर्मचारी संपावर जाणार आहेत. 14 डिसेंबरपासून हा संप सुरु होणार आहे. जुन्या पेन्शनसह इतर 17 मागण्यांच्या पूर्ततेसाठी राज्य सरकारी, निमसरकारी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी 14 डिसेंबरपासून पुन्हा बेमुदत संपावर जाणार आहेत.

राज्यातील 17 लाख कर्मचारी या संपात सहभागी होणार असल्याचा दावा समन्वय समितीच्या वतीनं करण्यात आला आहे. मार्च महिन्यात झालेल्या सात दिवसांच्या संपानंतर आश्वासन देऊनही त्यांची पूर्तता न झाल्यामुळं कर्मचारी संघटनेनं संपाची हाक दिली आहे.

Reason On Government Strike-

कर्मचाऱ्यांच्या सर्व मागण्यांबाबत योग्य निर्णय घेणार असल्याचं आश्वासन सरकारने दिलं होतं. मात्र, अद्याप शासनाने कोणताही निर्णय घेतलेला नाही. मात्र शासनस्तरावर वेळ मिळावा, या हेतूने कर्मचारी कृती समितीने आंदोलनला स्थगिती दिली होती. त्यानंतरही शासनस्तरावर हालचाली होत नसल्याचा कर्मचारी संघटनेचा आरोप आहे.

शासनाच्या आश्वासनाला 6 महिने होऊनही कुठलाही निर्णय होत नसल्याने राज्यातील सरकारी-निमसरकारी कर्मचारी व शिक्षकांनी पुन्हा एकदा आंदोलनाचा इशारा दिला आहे.

News Title : 17 lakh employees are on government strike

थोडक्यात बातम्या-

MLA disqualification | मोठी बातमी! आमदार अपात्र प्रकरणात नवा ट्विस्ट

सरकार शेतकऱ्यांना देतं 12 हजार रूपये, ‘ही’ योजना तुम्हाला माहितीये का?

Lumpy Skin | शेतकऱ्यांनो सावधान, ‘या’ आजाराची धास्ती पुन्हा वाढली!

अजित पवार यांची सर्वात मोठी घोषणा, “लोकसभेच्या ‘या’ 4 जागा लढवणार!”- Ajit Pawar

SBI मध्ये खातं असणाऱ्यांसाठी मोठी बातमी!