Gold Price Today | सोन्याचे दर भिडले गगनाला, पाहा किती रुपयांची झाली वाढ

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Gold Silver Rate Today | सोन्याला सध्या चांगलीच झळाळी मिळाल्याचं चित्र आहे. गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात (Gold Price Today) सातत्याने वाढ होताना पहायला मिळत आहे. आठवडाभरात सोन्याच्या दरात झालेली वाढ गुंतवणूकदारांना चांगला परतावा देणारी ठरली आहे, त्यामुळे ज्यांनी सोन्यात गुंतवणूक केली ते चांगलेच खूश आहेत.

सोन्याच्या दरात (Gold Price Today) किती रुपयांची वाढ?

गेल्या आठवडाभराचा विचार केला तर सोन्याच्या दरात तब्बल 2 हजार रुपयांची वाढ झाली आहे, या वाढीमुळे सोन्याचे दर GSTसह 65400 रुपये (Gold Price Including GST) इतक्या विक्रमी रुपयांवर जाऊन पोहोचले आहेत.

सोन्याच्या दरात का होतेय वाढ-

देशात सध्या लग्नाचा हंगाम सुरु झाला आहे. भारतात लग्न म्हटलं की सोन्याच्या दागिन्यांची खरेदी आलीच. सोन्याशिवाय लग्न होत नाहीत, त्यामुळे लग्नांचा हंगाम सुरु झाला की सोन्याच्या किंमतीत वाढ होताना पहायला मिळते. यंदाही लगीनसराई सुरु झाल्याने सोने तसेच चांदीच्या (Gold Silver Price) मागणीत वाढ झाली आहे.

लगीनसराईमुळे सोने तसेच चांदीचे दर दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत. गेल्या आठवड्याचा विचार केला तर सोन्याच्या दरात तब्बल 2 हजार रुपयांची वाढ नोंदवली गेली आहे. सोन्याचे दर वाढण्यामागे सोने व्यावसायिकांनी वेगळंच कारण वर्तवलं आहे.

सोने व्यावसायिकांच्या मते जागतिक पातळीवर अमेरिकन बँकाच्या वतीने व्याज दर वाढण्याची शक्यता वर्तविली जात होती. मात्र, त्यात कोणतीही वाढ न झाल्याने गुंतवणूकदारांनी आपली गुंतवणूक सोन्याकडे वळवली, या कारणामुळे सोन्याच्या मागणीत वाढ होऊन सोन्याच्या दरात वाढ झाली असावी, असा सोने व्यावसायिकांचा अंदाज आहे.

जळगावमध्ये काय आहेत सोन्याचे भाव? (Gold Price Today in Jalgaon)-

जळगावची ओळख सुवर्णनगरी अशी आहे. इथल्या भावावर राज्यातील सोने विक्रेते तसेच ग्राहकांचं लक्ष असतं. जळगावमध्ये सोन्याचे दर प्रतितोळा 63500 रुपये आहेत, तर जीएसटीसह हाच दर 65400 इतक्या विक्रमी किंमतीवर जाऊन पोहोचला आहे.

सोन्याने दर (Gold Price Today) वाढल्याने गुंतवणूकदारांची चांदी झाली आहे, मात्र ज्यांना सोने खरेदी करायची इच्छा होती त्यांनी वेट अँड वॉचची भूमिका घेतली असल्याचं पहायला मिळतंय. सोने व्यावसायिकांच्या मते आगामी काळात सोन्याचे दर आणखी वाढण्याची शक्यता आहे, कारण आता लग्नाचा हंगाम सुरु होत आहे आणि महाग असले तरी सोन्याशिवाय लग्नं होत नाहीत, त्यामुळे आगामी काळात सोने आणखी नवा पल्ला गाठण्याची शक्यता व्यक्त केली जातेय.

महत्त्वाच्या बातम्या-

Government Strike | ‘या’ कारणामुळे राज्यातील 17 लाख कर्मचारी संपावर!

MLA disqualification | मोठी बातमी! आमदार अपात्र प्रकरणात नवा ट्विस्ट

सरकार शेतकऱ्यांना देतं 12 हजार रूपये, ‘ही’ योजना तुम्हाला माहितीये का?

Lumpy Skin | शेतकऱ्यांनो सावधान, ‘या’ आजाराची धास्ती पुन्हा वाढली!

अजित पवार यांची सर्वात मोठी घोषणा, “लोकसभेच्या ‘या’ 4 जागा लढवणार!”- Ajit Pawar