Weather Update | नव्या वादळाची एन्ट्री, महाराष्ट्राच्या ‘या’ भागांवर मोठं संकट

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

पुणे | हवामान विभागाकडून (Department Of Meteorology) एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. राज्याच्या काही भागात नव्या चक्रीवादळाचा (Weather Update) धोका निर्माण झाला आहे. महाराष्ट्रात (Maharashtra Rain) पावसाचा जोर वाढत असताना दिसत आहे. त्यामुळे काही भागात अवकाळी पावसासह गारपीट झाल्यानं शेतकऱ्यांना चांगलाच फटका बसला आहे.

दरम्यान, नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात सुरु झालेल्या पावसाने राज्याच्या काही भागात मुक्काम केल्याचं समोर आलं आहे. याच पार्श्वभूमीवर हवामान विभागाकडून एक महत्त्वाची माहिती हाती आली आहे. भारतात पुन्हा नव्या चक्रीवादळाचा धोका निर्माण झाला आहे. बंगालचा उपसागरात कमी दाबाचा टप्पा निर्माण झाल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे.

काय आहे प्रकरण?

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचे रुपांतर चक्रीवादळात होण्याची शक्यता आहे, यामुळे 3 डिसेंबर रोजी नैर्ऋत्य बंगालच्या उपसागरात ‘मिचौंग चक्रिवादळ’ (Michaung Cyclone) येणार आहे. त्याचा परिणाम महाराष्ट्रावर होणार आहे. महाराष्ट्रात त्यामुळे पुन्हा एकदा अवकाळी पाऊस पडणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

राज्याच्या कोणत्या भागात पाऊस पडणार?

चक्रीवादळामुळे विदर्भासह उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, कोकण येथे शुक्रवारी पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. तसेच देशाच्या दक्षिण भागात चक्रीवादळाचा परिणाम जाणवणार आहे. या मागचं कारण देखील हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलं आहे.

Weather Update : IMD Gave ‘Orange Alert’

मिळालेल्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले असून ते चक्रीवादळात बदलणार आहे. 3 डिसेंबरपासून 5 डिसेंबरपर्यंत देशात मुसळधार पाऊस पडणार आहे. त्याच बरोबर हवामान विभागाने (Weather Update) काही भागांना ऑरेंज अलर्ट देखील जारी केला आहे.

चक्रीवादळामुळे भारतीय हवामान विभागाने तामिळनाडू किनारपट्टी आणि आंध्र प्रदेशात ‘ऑरेंज’ अलर्ट जारी केला आहे. दरम्यान, याचबरोबर महाराष्ट्रात देखील पुढील 24 तासात पाऊस पडणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. 

पुढील 24 राज्यात कुठे पाऊस पडणार?

महाराष्ट्रात गेले काही दिवस सुरु असलेल्या पावसाचा मुक्काम वाढत असताना दिसत आहे. त्यामुळे हवामान विभागाने मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात विजांच्या गडगडाटासह आणि वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवली आहे. मध्यम ते हलक्या स्वरुपाच्या पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाज आहे.

याचबरोबर, 24 तासांत विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. आयएमडी (IMD) ने वर्तवलेल्या अंदाजानुसार, आज अकोला, वाशिम, बुलढाणा, अमरावती या भागात वादळी वाऱ्यांसह गारपीट होण्याची शक्यता असल्याने या भागात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

News Title : weather update in this area

थोडक्यात बातम्या-

Government Strike | ‘या’ कारणामुळे राज्यातील 17 लाख कर्मचारी संपावर!

MLA disqualification | मोठी बातमी! आमदार अपात्र प्रकरणात नवा ट्विस्ट

सरकार शेतकऱ्यांना देतं 12 हजार रूपये, ‘ही’ योजना तुम्हाला माहितीये का?

Lumpy Skin | शेतकऱ्यांनो सावधान, ‘या’ आजाराची धास्ती पुन्हा वाढली!

अजित पवार यांची सर्वात मोठी घोषणा, “लोकसभेच्या ‘या’ 4 जागा लढवणार!”- Ajit Pawar