Malaika Arora सोबत लग्न कधी करणार?, अर्जुन कपूरने अखेर खरं ते सांगून टाकलं

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Malaika Arora | बॉलिवूडमधील आयटम डान्सर मलायका अरोरा आणि अभिनेता अर्जुन कपूर (Arjun Kapoor) यांचे प्रेमसंबंध आता साऱ्या जगाला माहीत आहेत. अरबाज खानसोबतचं लग्न तुटल्यानंतर तीने आपल्यापेक्षा वयाने लहान असलेल्या अर्जुन कपूरसोबत रिलेशनशीपला सुरुवात केली. आता या गोष्टीला जमाना होऊन गेला आहे, मात्र दोघांनी अद्याप लग्न केलेलं नाही. याच विषयावर कॉफी विथ करण कार्यक्रमात अर्जुनला बोलतं करण्याचा प्रयत्न करण जोहर केला. यावेळी अर्जुननं दिलेल्या उत्तराची एकच चर्चा सध्या सुरु आहे.

करण जोहरनं नेमका काय सवाल केला?

करणच्या ‘कॉफी विथ करण’ कार्यकक्रमात नेहमी वेगवेगळे सेलिब्रेटी सहभागी होत असतात. यावेळी त्याच्या या कार्यक्रमात आदित्य रॉय कपूर आणि अर्जुन कपूर उपस्थित होते. करण जोहर या कार्यक्रमात नेहमी सेलिब्रेटींना त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल प्रश्न विचारताना दिसतो. तसाच प्रश्न त्याने अर्जुन कपूरला देखील विचारला.

तो म्हणाला की, अर्जुन तुझं आणि मलायकाचं रिलेशन आता जगासमोर आहे. तुम्ही दोघंही आता एकत्र आयुष्य जगताय, मात्र आता तुम्ही हे नातं आणखी पुढं घेऊन जाणार आहात का?, म्हणजेच आता एवढं वर्षे तुम्ही एकमेकांना डेट करताय तर आता तुम्ही लग्न करणार आहात का?, असा थेट सवाल करण जोहरनं अर्जुन कपूरला विचारला.

अर्जुन कपूरनं काय उत्तर दिलं?

नेहमी नो कमेंट्स म्हणणारे कलाकार करणच्या शोमध्ये पोपटासारखे बोलतात. त्यामुळे करणच्या या प्रश्नावर अर्जुन कपूरनं देखील थेट बोलणं पसंत केलं. मलायका (Malaika Arora) इथं नसताना या प्रश्नावर उत्तर देणं मला योग्य वाटत नाही, तो एकप्रकारे तिच्यावर अन्याय ठरेल, असं अर्जुन कपूर म्हणाला.

“करण मी तुझ्या शोमध्ये येणं आणि इथं आल्यावर सर्व प्रश्नांची ईमानदारीनं उत्तरं देणं पसंत करतो, मात्र माझ्या आणि मलायकाच्या लग्नाच्या प्रश्नावर उत्तर द्यायला मी तयार नाही. मलायच्या शिवाय या प्रश्नावर इथं बसून उत्तर देणं योग्य होणार नाही. जेव्हा आम्ही लग्न करण्याचा निर्णय घेऊ तेव्हा आम्ही दोघं एकत्र येऊन या विषयावर बोलू मात्र सध्या तरी आम्ही एकमेकांसोबत खूश आहोत, मात्र तरीही मी एकट्यानं तुझ्या प्रश्नाचं उत्तर देणं योग्य ठरणार नाही”, असंही तो म्हणाला.

फ्लॉप सिनेमांबद्दलची अर्जुनचं मोठं वक्तव्य-

आपल्या एकामागून एक फ्लॉप जाणाऱ्या सिनेमांबद्दलही अर्जुननं वक्तव्य केलं. सुरुवातीच्या काळात हिट फिल्म्स दिलेल्या कलाकारांपैकी मी एक आहे. सध्या माझे सिनेमे फ्लॉप जात आहेत हे खरं असलं तरी कोणी जाणूनबुजून फ्लॉप सिनेमे देत नाही. प्रत्येक कलाकाराच्या आयुष्याचा हा एक भाग आहे, मात्र असं असलं तरी अभिनय करणं मी मरेपर्यंत सोडणार नाही, असं त्यानं सांगितलं.

News Title: Arjun Kapoor talks about Malaika arora and his marriage

महत्त्वाच्या बातम्या-

Animal सिनेमात रणबीर कपूरसोबत माझा किसिंग सीन!; बॉबी देओलचा धक्कादायक खुलासा

‘Rishi Kapoor महिलांसोबत वन नाईट स्टँड…’; नीतू कपूर यांचा धक्कादायक खुलासा

Share Market | ‘या’ शेअरने दिला तिप्पट परतावा; गुंतवणूकदार मालामाल

Gautami Patil | ‘…आता भीती वाटते’; गौतमीने केला मोठा खुलासा

LIC वाल्यांना छप्परफाड कमाई, रिटर्न्सचे आकडे ऐकाल तर थक्क व्हाल