CNG | सर्वसामान्य जनतेला मोठा फटका; सीएनजीच्या दरात ‘इतक्या’ रूपयांची वाढ

CNG | कच्च्या तेलाच्या किमतीत घट झाल्यानंतरही पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी होत नाहीत. दुसरीकडे सीएनजीच्या (CNG) दरातही वाढ होत आहे. देशाची राजधानी आणि आसपासच्या भागात सीएनजीच्या दरात वाढ करण्यात आली आहे. तीन आठवड्यात दुसऱ्यांदा ही वाढ झाली आहे.

सीएनजीच्या (CNG) दरात 1 रुपयांची वाढ झाली आहे. या वाढीनंतर देशाची राजधानी दिल्लीत सीएनजीची किंमत 76.59 रुपये प्रति किलोवर पोहोचली आहे. मात्र, दिल्लीत अजूनही सीएनजीची (CNG) किंमत पेट्रोलच्या तुलनेत 20 रुपये कमी आहे.

नवीन किमती आज म्हणजेच 14 डिसेंबर रोजी सकाळी 6 वाजल्यापासून लागू झाल्या आहेत. दिल्ली एनसीआरमध्ये सीएनजीच्या किमतीत किती वाढ झाली आहे.

CNG | दिल्लीत किती वाढ झाली?

देशाची राजधानी दिल्लीत सीएनजीच्या दरात तीन आठवड्यांत दुसऱ्यांदा वाढ झाली आहे. सीएनजीच्या दरात किलोमागे एक रुपयाने वाढ करण्यात आली आहे. त्यानंतर देशाची राजधानी दिल्लीत सीएनजीची किंमत 76.59 रुपये प्रति किलोवर पोहोचली आहे.

सीएनजीच्या दरात शेवटची घसरण जुलै महिन्यात झाली होती. ऑगस्ट आणि नोव्हेंबर महिन्यात सीएनजीच्या दरात वाढ झाली होती.

नोएडा, ग्रेटर नोएडा आणि गाझियाबादमध्येही सीएनजीच्या दरात वाढ झाली आहे. नोएडा आणि ग्रेटर नोएडामध्येही सीएनजीच्या दरात किलोमागे एक रुपयाची वाढ झाली आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

Uddhav Thackeray | मोठी बातमी! उद्धव ठाकरेंना धारावी पोलिसांचा धक्का

RCB ला मोठा झटका; लिलावाआधी वाईट बातमी समोर

Malaika Arora सोबत लग्न कधी करणार?, अर्जुन कपूरने अखेर खरं ते सांगून टाकलं

MLA disqualification | “निकाल दिला तर शिंदे अडचणीत येतील, त्यामुळे…”

Animal सिनेमात रणबीर कपूरसोबत माझा किसिंग सीन!; बॉबी देओलचा धक्कादायक खुलासा