मोठी बातमी! Ajit Pawar मुख्यमंत्री होणार?

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

मुंबई | अजित पवारांनी (Ajit Pawar) आजवर पाचवेळा महाराष्ट्राचं उपमुख्यमंत्रिपद भूषवलंय. मात्र आता अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत अशी इच्छा त्यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांची आहे. अशात उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) मुख्यमंत्री होणार असल्याच्या चर्चांना पुन्हा एकदा उधाण आलं आहे.

Ajit Pawar मुख्यमंत्री होणार?

विधी मंडळाचं सध्या हिवाळी अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनादरम्यान विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर शिवसेना आमदार अपात्रतेच्या प्रकरणाची सुनावणी देखील घेत आहेत.

काँग्रेस आमदाराचं मोठं वक्तव्य

शिवेसना आमदार अपात्रतेचा निकाल एकनाथ शिंदे यांच्या बाजूने लागला तर सध्याचं सरकार पुढच्या सहा ते दहा महिन्यांपर्यंतचा कार्यकाळ पूर्ण करेल. पण निकाल एकनाथ शिंदे यांच्या विरोधात लागला तर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडण्याची शक्यता आहे. अशात काँग्रेस आमदाराने मोठं वक्तव्य केलंय.

काँग्रेस आमदार कैलास गोरंट्याल यांनी मुख्यमंत्रीपदाबाबत मोठं वक्तव्य केलंय. हे या वर्षांचं अखेरचं हिवाळी अधिवेशन आहे. या अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन उपमुख्यमंत्री यांच्यासोबत फोटोसेशन झालं. या फोटोसेशन नंतर जो तो लॉबिंग करू लागलाय, असं कैलास गोरंट्याल म्हणालेत.

“आमदारांची लॉबिंग सुरू”

लॉबिंग यासाठी कारण सगळ्या आमदारांना वाटत आहे की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे डिसक्वॉलिफाय होतील. आमदार अपात्रतेत ते बाद झाल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार मुख्यमंत्री बनतील. त्यामुळे विरोधक सत्ताधाऱ्यांना आणि सत्ताधारी विरोधकांना डोळे मारत होते, असा धक्कादायक दावा कैलास गोरंट्याल यांनी केला.

महत्त्वाच्या बातम्या- 

Royal Enfield | मायलेजला ‘बाप’ गाडी; एका लिटरमध्ये ‘इतके’ किलोमीटर धावते

CNG | सर्वसामान्य जनतेला मोठा फटका; सीएनजीच्या दरात ‘इतक्या’ रूपयांची वाढ

Uddhav Thackeray | मोठी बातमी! उद्धव ठाकरेंना धारावी पोलिसांचा धक्का

RCB ला मोठा झटका; लिलावाआधी वाईट बातमी समोर

Malaika Arora सोबत लग्न कधी करणार?, अर्जुन कपूरने अखेर खरं ते सांगून टाकलं