पुणे हादरलं! ‘या’ भागातून तब्बल 2 कोटींचं ड्रग्स जप्त

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Pune drugs racket | सांस्कृतिक आणि शैक्षणिक चळवळीचे केंद्र म्हणून ओळख असलेल्या पुण्यात धक्कादायक घटना घडत आहेत. पुण्यात गुंडांचा वावर वाढतोय, ड्रग्स प्रकरण (Pune drugs racket) समोर येतायेत. भर दिवसा गोळीबार केला जातोय. त्यामुळे पुणे आता ‘उडता पंजाब’ होतोय काय?, असा सवाल केला जात आहे.

पुण्यातील वाढती गुन्हेगारी बघता तिथे आता अमितेश कुमार यांची पोलिस अय्युक्त म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. अमितेश कुमार यांचा गुन्हेगारी संपण्यात चांगला रेकॉर्ड आहे. त्यामुळे पुण्यातील स्थिती सुधारेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. असं असतानाच एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.

पुण्यात ड्रग्स तस्करांवर (pimpri chinchwad drug racket) करण्यात आलेली कारवाई ताजी असतानाच आता अजून एक मोठं प्रकरण समोर आल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जातंय. आता पिंपरी-चिंचवड येथेही मोठ्या प्रमाणात ड्रग्सचे रॅकेट असल्याचं उघडकीस आलं आहे. त्यामुळे पुण्यात नेमकं चाललंय तरी काय?, असा सवाल केला जात आहे.

पिंपरी-चिंचवडमधून मेफेड्रोन जप्त

पिंपरी-चिंचवड परिसरात तब्बल 2 कोटी रुपयांचे 2 किलो 38 ग्रॅम मेफेड्रोन जप्त करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. सांगवी (sangvi police) पोलिसांनी यावर मोठी कारवाई केली आहे. सांगवी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील रक्षक चौकात दोन कोटी दोन लाख रुपयांचे दोन किलो 38 ग्रॅम मेफेड्रोन (Pune drugs racket) पोलिसांनी जप्त केलं आहे.

पुण्यात ड्रग्स रॅकेटचं मोठं जाळं?

पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचे नाव नमामी झा असं आहे. काल सकाळी (1 मार्च) पिंपळे निलख परिसरातील रक्षक चौकात एक इसम पांढरी पिशवी घेऊन थांबला होता. त्याच्या हालचाली पोलिसांना संशयित वाटल्या. सांगवी पोलिसांना याची माहिती देण्यात आली.

पुढे, पोलिसांनी रक्षक चौकात सापळा रचून त्याला पकडलं. आता हा आरोपी नमामी झा नेमकं कुणाला मेफ्रेड्रोन ड्रग्स देणार होता? त्याच्या पाठीमागे कोण आहे?, याबाबत पोलिस तपास करत आहेत.

News Title : Pune drugs racket Mephedrone worth 2 crore seized from Pimpri-Chinchwad

महत्त्वाच्या बातम्या-

महाशिवरात्रीचा उपवास करत असाल तर ‘या’ चूका करू नका

‘अशा’ व्यक्तींकडे कितीही कमावले तरी पैसे टिकत नाही!

धक्काबुक्की का झाली?; महेंद्र थोरवेंनी सांगितलं खरं कारण

अल्पवयीन मुलीसोबत घडला भयानक प्रकार, ऐकून पायाखालची जमीन सरकेल

सावधान! राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी