अल्पवयीन मुलीसोबत घडला भयानक प्रकार, ऐकून पायाखालची जमीन सरकेल

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Crime News | सोशल मीडिया जितका चांगला आहे तितका तो धोकादायकही आहे. इंटरनेटमुळे अनेकजन संपर्कात आले आहेत. मात्र संपर्कात आलेली व्यक्ती ही विश्वासू आहे का? हे इंटरनेट सांगत नाही, त्याला मात्र ओळख असावी लागते. या टेक्नॉलॉजिचे फायदे जसे आहेत तसे तोटे देखील आहेत. अशीच एक धक्कादायक घटना घडली आहे. एक मुलाने आपल्या सोशल मीडियावर मुलीच्या नावानं फेक अकाऊंट उघडलं आणि मुलीचा विश्वास संपादन करून अल्पवयीन मुलीसोबत धक्कादायक कृत्य केलं. (Crime News)

मुलीचा विश्वास संपादन करून…

मुलीचा विश्वास संपादन करून मुलीला आपल्या प्रायव्हेट फोटोची मागणी एका युवकाने केली आहे. सुभान अली असं त्या मुलाचं नाव असून त्याने सोशल मीडियावर मुलीच्या नावाचे फेक अकाऊंट बनवलं. त्याला उत्तराखंड पोलिसांनी ताब्यात घेतलं असल्याची माहिती समोर आली आहे. आरोपीचं वय हे 27 वर्षे आहे. तर पीडित मुलगी ही अल्पवयीन आहे. (Crime News)

ट्रूथ अँड डेअरच्या नावाखाली धक्कादायक प्रकार

सोशल मीडियावर ट्रूथ अँड डेअरच्या नावाखाली दिल्लीतील एका अल्पवयीन मुलीसोबत सुभान अली या आरोपीनं मैत्री केली. त्यानंतर तिचा विश्वास संपादन केला. ट्रूथ अँड डेअर खेळत असताना त्याने तिला आपल्या प्रायव्हेट व्हिडीओ आणि फोटो पाठवण्याबाबत डेअर दिलं. त्यानंतर ते फोटो सोशल मीडियावर व्हायरल करेल अशी ब्लॅकमेलिंगही केली होती. त्यानंतर एकेदिवस हा धक्कादायक प्रकार पीडित मुलीच्या आईने पाहिला. त्यानंतर तिच्या बाबांनी त्याविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी पोलीस ठाण्यात जात गुन्हा (Crime News) दाखल केला आहे. (Crime News)

आरोपी सुभान हा आपल्या मुलीला त्रास देत आहे. ब्लॅकमेल करत असल्याचं मुलीच्या बाबांनी तक्रारीमध्ये नमूद केलं आहे. मुलीचे खासगी फोटो आणि व्हिडीओ हे सोशल मीडियावर व्हायरल करेल अशी त्यांनी धमकी आणि ब्लॅकमेल केलं असल्याचं पीडितीच्या बाबांनी तक्रारीमध्ये नमूद केलं.

एक दिवस पीडित मुलीच्या आईच्या हाताशी मोबाईल लागला. त्यामध्ये अलीने मुलगी असल्याचे भासवून पीडितीचे फोटो आणि व्हिडीओ पाठवले होते. त्यावेळी आरोपीच्या आईला धक्काच बसला. त्यावेळी पीडितीच्या आईने आपल्या मुलीला खडसावलं तेव्हा घडलेला सर्व प्रकार समोर आला. त्यानंतर आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

आरोपीस अटक

आरोपीनं मुलीचं फेक अकाऊंट उघडलं होतं. त्या अकाऊंटला जोडलेला मोबाईल क्रमांकाचा पोलिसांनी शोध घेतला. तो मोबाईल उत्तराखंडमधील उधमसिंहमधील होता. 24 फेब्रुवारीला पोलिसांनी छापा मारत अटक केली. त्याने आपला गुन्हा कबूल केला असून याबाबत आणखी तपास सुरू आहे.

News Title – Crime News delhi update

महत्त्वाच्या बातम्या

सावधान! राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी

सलमानमुळे घेतलेल्या ‘त्या’ निर्णयाचा ऐश्वर्याला आजही होतोय पश्चाताप!

“मोदी-शहा देश चालवायच्या लायकीचे नाहीत…”; ‘हा’ नेता भडकला

मोठी बातमी! संभाजी भिडे थोडक्यात वाचले, धक्कादायक माहिती समोर

बारामतीचा उमेदवार ठरला!; अखेर राष्ट्रवादीच्या नेत्याचा मोठा खुलासा