Nana Patole | गेल्या काही दिवसांपासून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप पाहायला मिळत आहेत. आता तर आगामी लोकसभा निवडणुका तोंडावर आल्या आहेत. याचपार्श्वभूमीवर सत्ताधारी विरोधकांवर तर विरोधक सत्ताधाऱ्यांवर टीकेची तोफ डागत आहे. अशातच आता काँग्रेस नेते नाना पटोले (Nana Patole) यांनी पंतप्रधान नेरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा याची लायकी काढली आहे.
नाना पटोले (Nana Patole) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा आणि जे.पी. नड्डा यांचा सध्या महाराष्ट्र दौरा सुरू असलेलं पहायला मिळत आहे, यावर पटोले (Nana Patole) यांनी चांगलाच समाचार घेतला. हे तिघंही महाराष्ट्रामध्ये येतात का? आमची तयारी बरोबर आहे. जनता आमच्या बाजूने आहे. कसब्याच्या निवडणुकीत अमित शहा आले. त्यांना देश चालवायला दिला आहे ना?, असा सवाल नाना पटोले (Nana Patole) यांनी केला आहे.
कोरोनामध्ये गंगेच्या शुद्धीकरणासाठी हजारो कोटी रूपये घालवण्यात आले. मात्र ती घाण साफ झाली नाही. कोरोनामध्ये प्रेत तरंगत होती. मोदी आणि शहा हे प्रचारक आहेत. त्यांना प्राचारक म्हणून ठेवावं ते देश चालवायच्या लायकीचे नाहीत, असं म्हणत नाना पटोले यांनी टीकेची तोफ डागली आहे.
शरद पवारांबाबत नाना पटोले काय म्हणाले?
वंचितचे प्रकाश आंबेडकर हे सोबत असतील. तसेच भाजपविरोधीचे पक्ष असतील. लोकशाही आणि संविधान हे धोक्यात आहे, ते वाचवायंचं आहे, असं नाना पटोले म्हणाले आहेत. तसेच बारामतीमध्ये सरकारच्या योजनेचा मोठा मेळावा आहे. या मेळाव्यामध्ये शरद पवार देखील उपस्थित आहेत. यावर नाना पटोले म्हणाले की शरद पवार यांनी सरकारला घरी जेवणासाठी आमंत्रित केलं आहे. शरद पवार म्हणाले ज्याठिकाणी कार्यक्रम आहे ती माझीच शाळा आहे. त्या कार्यक्रमाला जाईन, असं शरद पवार म्हणाले असल्याचं नाना पटोले यांनी सांगितलं आहे.
जागावाटपाला नाना पटोले अनुपस्थित राहणार
नाना पटोले यांनी जागावाटपाबाबत महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर आणि आमच्यात चांगले समन्वय आहे. प्रकाश आंबेडकर मोठे नेते आहेत. माझ्याबद्दल त्यांनी बोलणं हा त्यांचा अधिकार आहे. त्याचं ऐकूण त्यात काही सुधारणा करणं हे आमचं काम असल्याचं नाना पटोले म्हणाले आहेत.
त्यानंतर त्यांनी ते स्वत: जागावाटपाच्या बैठकीला नसणारेत असं सांगितलं आहे. बाळासाहेब थोरात, प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे हे बैठकीला असतील, असं नाना पटोले म्हणाले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
बारामतीचा उमेदवार ठरला!; अखेर राष्ट्रवादीच्या नेत्याचा मोठा खुलासा
मोठी बातमी! शिंदे गटाच्या आमदारांमध्ये हाणामारी
‘हा’ शेअर करेल मालामाल; गुंतवणूकदारांना अंत्यत मोलाचा सल्ला
आमदार संजय गायकवाड यांचा आणखी एक व्हिडीओ व्हायरल!
‘या’ भागात जोरदार पावसाची शक्यता; हवामान विभागाचा महत्वाचा इशारा