Sanjay Gaikwad | गेल्या काही दिवसांपासून शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला आहे. शिवजयंतीला त्यांनी स्वत:बद्दल धक्कादायक खुलासा केला होता. त्यांनी काही वर्षांआधी वाघाची शिकार करत वाघाचा एक दात आपल्या गळ्यामध्ये परिधान केल्याचं सांगितलं होतं. त्यांच्या एका मुलाखतीचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. आता त्यांचा आणखी एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
गेल्या काही दिवसांपासून संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांनी वाघाची शिकार केल्याप्रकरणी मौन बाळगलं होतं. या त्यांच्या वक्तव्याने वनविभागाने त्यांचा समाचार घेतला आहे. त्यानंतर त्यांनी बिबट्या वगैरे आपण असेच पाळतो असं वक्तव्य केलं होतं. या वक्तव्यामुळे त्यांची सर्वत्र चर्चा होती. मात्र नंतर त्यांचा शिवजयंतीचा आणखी एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. (Sanjay Gaikwad)
आपल्या हातात काठी घेत ते तरूणांवर काठीने हल्ला करत आहेत. आजू बाजूला पोलीस देखील आहेत. गायकवाड (Sanjay Gaikwad) यांनी आपल्या बॉडीगार्डची काठी घेत युवकांवर सपासप हल्ला केला आहे. यामुळे शिवजयंतीच्या कार्यक्रमामध्ये गोंधळ उडाला. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.
पोलीस प्रशासनावर प्रश्नचिन्ह
बुलढाण्यातील शिवजयंती दिवशी हा धक्कादायक प्रकार घडला आहे. आजूबाजूला पोलीस असूनही पोलिसांनी संजय गायकवाड यांच्यावर कोणताही गुन्हा दाखल केला नाही. तसेच त्यांना ताब्यातही घेतले नाही. यामुळे पोलीस प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित होताना दिसत आहे.
शेतजमीन प्रकरणात गुन्हा दाखल
शेतजमीन प्रकरणी संजय गायकवाड आणि त्यांचे चिरंजीव मृत्युंजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयाने 17 फेब्रुवारीपर्यंत आदेश दिले होते. 28 फेब्रुवारी रोजी त्यांच्यावरील गुन्ह्याची सुनावणी करण्यात आली आहे.
शिवजयंती दिवशी आमदार संजय गायकवाड यांनी माध्यमांशी बोलत असताना गळ्यात परिधान केलेल्या दाताबद्दल विचारलं असता ते म्हणाले की, हा वाघाचा दात आहे. मी वाघाची शिकार करून दात गळ्यात घातलाय.
News Title – Sanjay Gaikwad Shivjayanti video viral
महत्त्वाच्या बातम्या
सुरेश धस मराठा आरक्षणावर काय बोलले?, का होतेय या भाषणाची एवढी चर्चा? पाहा व्हिडीओ
‘…त्यांचा शब्द डावलणं थोडं जड जातंय’; जरांगे स्पष्टच बोलले
चाणक्यानं सांगून ठेवलंय, ‘या’ पाच जागांवर असेल घर तर होईल बरबादी!