‘हा’ शेअर करेल मालामाल; गुंतवणूकदारांना अत्यंत मोलाचा सल्ला

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Share Market | शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करताना बराच विचार करावा लागतो. चुकीचा शेअर खरेदी केला तर बऱ्याचदा नुकसानीला सामोरं जावं लागतं. यात आर्थिक घाटा होण्याचा मोठा चान्स असतो. त्या उलट जर माहिती करून शेअर (Share Market) खरेदी केला तर, तोच शेअर आपल्याला बक्कळ कमाई करून देतो.

एक्स्पर्टचे सल्ले यासाठी महत्वपूर्ण भूमिका बजावतात. तुम्हीही शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवत असाल तर, एकदा ही बातमी नक्की वाचा. कारण, एक्स्पर्टने एक असा शेअर सांगितला आहे, ज्यामुळे तुम्हाला फायदाच फायदा मिळू शकतो.

‘हा’ शेअर करेल मालामाल

त्रिवेणी टर्बाइनच्या समभागांनी मल्टीबॅगर परतावा दिला आहे. कोविड नंतर NSE वर त्रिवेणी टर्बाइन शेअरची (Share Market) किंमत सुमारे 50 रुपयांनी वाढून 480 च्या पातळीवर पोहोचली आहे. यामुळे गुंतवणूकदारांना 860 टक्के परतावा मिळाला.

काही ब्रोकरेज कंपन्यांना अजूनही या मल्टीबॅगर स्टॉकमध्ये थोडी चढ-उतार दिसत आहे. मोतीलाल ओसवाला यांनी त्रिवेणी टर्बाइनच्या शेअर्सवर प्रति शेअर 540 च्या लक्ष्य किंमतीसह त्याला खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.

कंपनीने दिला चांगला परतावा

गेल्या एका महिन्यात त्रिवेणी टर्बाइनच्या शेअरच्या किमतीत 25 टक्क्यांनी वाढ झाली आहे. हा मल्टीबॅगर स्टॉक गेल्या सहा महिन्यांत 20 टक्क्यांहून अधिक वाढला आहे. गेल्या वर्षभरात त्रिवेणी टर्बाइनच्या शेअरच्या (Share Market)  किमतीत 40 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

मार्च 2020 च्या शेवटी त्रिवेणी टर्बाइन शेअरची किंमत सुमारे 50 प्रति शेअरपर्यंत घसरली आणि आज त्रिवेणी टर्बाइन शेअरची किंमत सुमारे 480 आहे. याचा अर्थ मल्टीबॅगरचा स्टॉक सुमारे चार वर्षांत 860 टक्क्यांनी वाढला आहे. भविष्यात हाच स्टॉक अधिक फायदा मिळवून देऊ शकतो, असा अंदाज एक्स्पर्टने वर्तवला आहे. त्यामुळे आताच जर या शेअरची खरेदी केली तुम्हीही मालामाल होऊ शकता.

News Title- Share Market Important advice from experts to investors

महत्वाच्या बातम्या-

सुरेश धस मराठा आरक्षणावर काय बोलले?, का होतेय या भाषणाची एवढी चर्चा? पाहा व्हिडीओ

‘…त्यांचा शब्द डावलणं थोडं जड जातंय’; जरांगे स्पष्टच बोलले

चाणक्यानं सांगून ठेवलंय, ‘या’ पाच जागांवर असेल घर तर होईल बरबादी!

महाराष्ट्राच्या राजकारणात सर्वात मोठा ट्विस्ट!

पंकजा मुंडेंचं एक पाऊल पुढे; भाऊ धनंजय मुंडेही करणार मदत