‘…त्यांचा शब्द डावलणं थोडं जड जातंय’; जरांगे स्पष्टच बोलले

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Manoj Jarange Patil | मराठा आरक्षणाला (Manoj Jarange Patil) एक राजकीय रंग लागला आहे असं सत्ताधाऱ्याचं म्हणणं आहे. अनेक महिन्यांपासून मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) हे मराठा आरक्षणासाठी आंदोलन, उपोषण करत आहे. मराठा समाजाला ओबीसीमधून सामावून घ्यावं ही मराठा समाजाची महत्त्वाची मागणी होती. मात्र मराठा आरक्षणाला आता राजकीय स्वरूप प्राप्त झालं असल्याचं बोललं जात आहे. प्रकाश आंबेडकर यांनी मनोज जरांगे पाटील (Manoj jarange Patil) यांना लोकसभा निवडणूक लढवण्याबाबत ऑफर दिली आहे.

वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांची बुधवारी महाविकास आघाडीसोबत जागा वाटपाची बैठक झाली. यामध्ये आगामी लोकसभेच्या पार्श्वभूमीवर विविध मुद्द्यांवर चर्चा झाली आहे. त्या बैठकीमध्ये मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांना आगामी लोकसभेसाठी जालन्यातून तिकिट देण्याची मागणी प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या ऑफरनंतर आरक्षणाला राजकीय रंग लागला आहे का?, असा सवाल उपस्थित झाला आहे.

प्रकाश आंबेडकर यांच्याकडून ऑफर

प्रकाश आंबेडकर यांनी जालना मतदारसंघातून आगामी लोकसभेमध्ये मनोज जरांगे पाटील यांना तिकिट द्यावं अशी भूमिका स्पष्ट केली आहे. यावर मनोज जरांगे पाटील यांना माध्यमांनी पत्रकार परिषदेत विचारलं असता मनोज जरांगे पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

जरांगे यांची भूमिका स्पष्ट

अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली होती, त्यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली आहे. त्यानंतर प्रकाश आंबेडकर यांनी जरांगे यांना दिलेल्या ऑफरवरून प्रतिक्रिया दिली. प्रकाश आंबेडकर यांचा शब्द डावलणं थोड जड जात आहे. माझं त्यांना आदरपूर्वक म्हणणं आहे की माझा सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा आहे. यामुळे सगळा फोकस गोरगरीब मराठ्यांना आरक्षण मिळवून देण्याकडे आहे.

मी हा लढा समाजासाठी उभा केला आहे. माझा राजकीय मार्ग नाही माझा सामाजिक मार्ग आहे. हा लढा समाजासाठी उभा आहे, असं म्हणत राजकीय भूमिका घेणार नसल्याचं मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट केलं आहे.

मराठा समाज निवडणूक लढवावी अशी इच्छा व्यक्त करत आहे?, असा प्रश्न मनोज जरांगे पाटील यांना प्रश्न करण्यात आला त्यावर, समाज हा फक्त माझा मालक आहे. जर तरला उपयोग नाही, सध्या फक्त आरक्षणाचा ज्वलंत मुद्दा आहे. समाजाचा प्रश्न हाच माझ्यासाठी सर्वात महत्त्वाचा आहे, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले आहेत.

News Title – Manoj Jarange Patil Replied to prakash ambedkar Election Ticket Offer 

महत्त्वाच्या बातम्या

मराठा आंदोलक भडकले, आंदोलकांकडून भाजपच्या नेत्याला शिवीगाळ

‘…त्यांच्या शब्दापुढं मी जात नाही’; मनोज जरांगेंचं मोठं वक्तव्य

ऐश्वर्याच्या आठवणीत अजूनही रडतोय सलमान, व्हिडीओ होतोय व्हायरल

मोठी बातमी समोर! मंत्रालयात घडलेल्या प्रकाराने महाराष्ट्रात खळबळ

मोठी बातमी! आमदार रोहित पवारांना धक्का, अडचणी आणखी वाढणार