‘…त्यांच्या शब्दापुढं मी जात नाही’; मनोज जरांगेंचं मोठं वक्तव्य

Manoj Jarange Patil | गेल्या काही महिन्यांपासून मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) हे मराठा आरक्षणासाठी लढा देताना दिसत आहेत. ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्यावं अशी त्यांची सरकारकडे मागणी आहे. यामुळे आता मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) पुन्हा एकदा ओबीसी प्रवर्गातून सरकारने आरक्षण द्यावं यासाठी आंदोलन करत आहेत. याचपार्श्वभूमीवर गिरीश महाजन यांनी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांना फटकारलं होतं. मात्र आता मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी गिरीश महाजन यांच्यावर पलटवार केला आहे.

जरांगे पाटलांचा जोरदार हल्लाबोल

मनोज जरांगे पाटील यांच्यावर गिरीश महाजन यांनी हल्लाबोल केला. मनोज जरांगे पाटील यांचे लाड केले होते, मात्र आता त्यांना माफी नाही असं वक्तव्य गिरीश महाजन यांनी केलं आहे. यावर जरांगे म्हणाले की “मोदीसाहेब आले गेले, मला चॅलेंज देऊ नका, जनता आम्हाला कळते, तुम्ही आमचे काय लाड केले, मला बोलायला लावू नका, समाजाला एक सांगतो मी सामाजासाठी लढत आहे, समाजच माझा मालक आहे. त्यांच्या शब्दापुढं मी जात नाही.”

प्रकाश आंबेडकर यांच्याकडून ऑफर

वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मनोज जरांगे पाटील यांना जालन्यातून लोकसभा निवडणुकीची संधी द्यावी, अशी मागणी केली आहे. बुधवारी महाविकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडीची बैठक पार पडली यामध्ये त्यांनी जरांगे यांना जालन्याची सीट देण्याबाबत चर्चा केली आहे.

प्रकाश आंबेडकर यांनी मनोज जरांगे पाटील यांना जालन्यातून लोकसभेचं तिकिट देण्याबाबत मागणी केली आहे. यावर मनोज जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “मी प्रकाश आंबेडकर यांचा कसा शब्द टाळू, तरीही माझा फोकस फक्त आरक्षणावर आहे.

त्यानंतर ते म्हणाले की, “माझा राजकीय नाही, माझा समाजिक लढा आहे. मी माझ्या समाजाविरोधात जाणार नाही”, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले आहेत,

काय म्हणाले होते गिरीश महाजन

“मनोज जरांगे स्वत:ला राजा समजू लागले आहेत आणि वागू लागले आहेत. त्यांनी आरक्षणावर बोलवं त्यांनी मर्यादेत बोलावं ते आता मर्यादेत न बोलता आरक्षण सोडून राजकारणामध्ये आले आहेत”, अशी गिरीश महाजन यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका केली आहे.

News Update – Manoj Jarange Patil girish mahajan news update

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील यांना दहा टक्के आरक्षण मान्य पण…

नशेत धूत होऊन सलमान पोहोचला सेटवर, डायरेक्टरनं केलं असं काही की..

“लग्नानंतर व्यक्ती कधीही..”, कॅटरिनासोबतच्या नात्यावर विकी कौशलचा मोठा खुलासा

अभिनेत्री दीपिका पादुकोणने दिली मोठी गुड न्यूज; पोस्ट करत म्हणाली..

अफाट यश मिळवायचंय?, मग ‘या’ गोष्टी कायम लक्षात ठेवा!