अफाट यश मिळवायचंय?, मग ‘या’ गोष्टी कायम लक्षात ठेवा!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Chanakya Neeti | आचार्य चाणक्य यांची धोरणे मानवी जीवनात अत्यंत उपयुक्त ठरतात. मानवी जीवनातील अनेक समस्यांवर त्यांनी काही उपाय आणि तत्वे सांगितली आहेत. अगदी वैयक्तिक आयुष्यातील विकास, प्रगती अथवा चुका असो किंवा सामाजिक गोष्टी असोत त्यांनी प्रत्येक पैलूवर आपले विचार (Chanakya Neeti ) मांडले आहेत.

चाणक्य यांनी सांगितलेली तत्वे जर पाळली तर, अनेक समस्याचे निराकरण होण्यास मदत होते. त्यांनी सांगितलेल्या धोरणांना आपण चाणक्य नीती असं म्हणतो. व्यक्तीने आपल्या जीवनात कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत आणि पाळल्या पाहिजेत. तसंच माणसाचे यश कोणकोणत्या गोष्टींवर अवलंबून असतं तेही त्यांनी आपल्या धोरणांमध्ये सांगितलं आहे.

तुम्हाला जर यशाचे उच्च शिखर गाठायचे असेल तर, तुम्ही चाणक्य यांनी सांगितलेल्या धोरणांचा अवलंब करायला हवा. तुम्ही सुद्धा तुमची ध्येय प्राप्ती करू शकता. चाणक्य यांनी यशस्वी होण्यासाठी काही धोरणे सांगितली आहेत. त्याचं पालन केलं तर तुम्हालाही अफाट यश मिळेल.

त्यजेद्धर्म दयाहीनं विद्याहीनं गुरुं त्यजेत् ।
त्यजेत्क्रोधमुखी भार्या निःस्नेहान्बान्धवांस्यजेत् ।।

हा श्लोक कायम स्मरणात ठेवायला हवा. कारण, कोणत्याही धर्मात जर करुणाभाव, प्रेम आणि आदर नसेल तर त्याचा त्वरित त्याग करायला हवा. यात अडकून राहू नये. यासोबतच ज्या शिक्षकाला विद्येचे ज्ञानच नाही त्याचाही त्याग (Chanakya Neeti ) करावा.

रागीट किंवा स्नेहभाव नसणाऱ्या नातेवाईकांपासून आपण दुर राहायला हवे. याचं कारण असं की, जिथे करुणा नाही तिथे विकास होत नाही आणि ज्या कुटुंबामध्ये प्रेम नाही तिथे अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. तिथे आदरभाव राहत नाही. यामुळे आपण प्रगती करण्याऐवजी या गोष्टीतच अडकून राहतो.

यथा चतुर्भिः कनकं परीक्ष्यते निर्घषणच्छेदन तापताडनैः ।
तथा चतुर्भिः पुरुषः परीक्ष्यते त्यागेन शीलेन गुणेन कर्मणा ।।

आचार्य चाणक्य (Chanakya Neeti ) म्हणतात की, ज्याप्रकारे सोन्याची परीक्षा चार गोष्टींनी केली जाते: घर्षण, कापणे, तापणे आणि हातोड्याचे प्रहार सहन करणे. तसंच मानवी जीवनात त्याग, नम्रता, गुण आणि कृती याची परीक्षा होत असते. ज्याप्रमाणे खऱ्या सोन्याला त्याची सत्यता मिळवण्यासाठी अनेक प्रकारच्या परीक्षांना सामोरे जावे लागते. त्याचप्रमाणे महान व्यक्ती त्यांच्या स्वभावातून आणि त्यागाच्या भावनेने ओळखली जाते. अंशी व्यक्तीची सतत परीक्षा घेतली जाते.

News Title-  Chanakya Neeti for success

महत्त्वाच्या बातम्या –

अक्षय कुमारकडून मुलींचे वसतिगृह बांधण्यासाठी 1 कोटी रूपयांचे दान!

सामन्यादरम्यान चाहत्याचा मैदानात शिरकाव; स्टार्कच्या पत्नीनं शिकवला चांगलाच धडा

सर्वोच्च न्यायालयाचा एक निर्णय अन् बाबा रामदेव यांचे 2300 कोटींचे नुकसान!

झारखंड! रेल्वेचा भीषण अपघात; 12 जणांचा मृत्यू, भागलपूर-यशवंतपूर एक्स्प्रेसची धडक

तापसी पन्नू लग्न करणार असल्याची चर्चा; अभिनेत्रीचं सूचक विधान, म्हणाली…