अक्षय कुमारकडून मुलींचे वसतिगृह बांधण्यासाठी 1 कोटी रूपयांचे दान!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Akshay Kumar | बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार सध्या त्याच्या आगामी प्रोजेक्ट्समुळे चर्चेत आहे. त्याचा ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ हा चित्रपट 10 एप्रिलला चाहत्यांच्या भेटीसाठी सज्ज आहे. अशातच तो उदयपूरमध्ये ‘खेल खेल में’ या पुढच्या चित्रपटाचे शूटिंग करत आहे. यात त्याच्यासोबत तापसी पन्नू दिसणार आहे. आता बातमी अशी आहे की अभिनेत्याने तिथे वसतिगृह बांधण्यासाठी 1 कोटी रुपयांची देणगी दिली आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, अक्षय कुमारने शूटिंग शेड्यूलमधून ब्रेक घेतला आणि खेरवारा कॅन्टोन्मेंटमधील वनवासी कल्याण परिषद वसतिगृहाला भेट दिली. तिथे त्याने पूजा केली ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. असे सांगितले जात आहे की जेव्हा अभिनेता तिथे पोहोचला तेव्हा आरती होत होती. जेव्हा मुलांनी त्याला पाहिले तेव्हा त्यांना खूप आनंद झाला.

‘खेल खेल में’ची तयारी

खरं तर हे वसतिगृह अक्षय कुमारच्या वडिलांच्या नावावर आहे. वर्षभरापूर्वी अभिनेत्याने हे वसतिगृह बांधण्यासाठी आपला पाठिंबा दर्शवला होता. त्यानंतर या वसतिगृहाचे नाव राजस्थान वनवासी कल्याण परिषद हरिओम आश्रम वसतिगृह असे ठेवण्यात आले. आता अभिनेत्याने मुलींच्या वसतिगृहाच्या बांधकामासाठी 1 कोटी रुपयांची देणगी जाहीर केली आहे.

अलीकडेच अक्षय कुमार लोकसभा निवडणूक लढवणार असल्याच्या बातम्याही समोर आल्या होत्या. त्याला भारतीय जनता पक्ष अर्थात भाजपकडून तिकीट मिळेल, असे सांगितले जात होते. भाजप त्याला दिल्लीच्या चांदनी चौक मतदारसंघातून उमेदवारी देऊ शकते, अशी चर्चा रंगली होती.

Akshay Kumar कडून 1 कोटींचे दान

दरम्यान, दिल्लीतील चांदणी चौक या जागेवरून सध्या डॉ. हर्षवर्धन खासदार आहेत. मात्र, या वृत्ताला पक्ष आणि अभिनेत्याने अद्याप दुजोरा दिलेला नाही. ‘खेल खेल में’ या चित्रपटाबद्दल बोलायचे झाले तर, हा चित्रपट मुदस्सर अझीझ दिग्दर्शित आहे.

अक्षय आणि तापसीशिवाय वाणी कपूर, आदित्य सीलही यात असल्याची चर्चा आहे. या प्रकल्पाशी संबंधित अधिक माहिती येणे बाकी आहे. सध्या अक्षय कुमार ‘बडे मियाँ छोटे मियाँ’मध्ये त्याचे ॲक्शन कौशल्य दाखवताना दिसणार आहे. यात त्याच्यासोबत टायगर श्रॉफही दिसणार आहे. हा चित्रपट एप्रिलमध्ये प्रदर्शित होईल.

News Title- Bollywood actor Akshay Kumar has donated Rs 1 crore for a girls’ hostel in Udaipur

महत्त्वाच्या बातम्या –

सामन्यादरम्यान चाहत्याचा मैदानात शिरकाव; स्टार्कच्या पत्नीनं शिकवला चांगलाच धडा

सर्वोच्च न्यायालयाचा एक निर्णय अन् बाबा रामदेव यांचे 2300 कोटींचे नुकसान!

झारखंड! रेल्वेचा भीषण अपघात; 12 जणांचा मृत्यू, भागलपूर-यशवंतपूर एक्स्प्रेसची धडक

तापसी पन्नू लग्न करणार असल्याची चर्चा; अभिनेत्रीचं सूचक विधान, म्हणाली…

BCCI ची कारवाई! इशान आणि श्रेयसचा ‘पगार’ बंद; जय शाहंनी दिला होता इशारा